कालव्यात कचरा ; पाणी वाटप अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:12 IST2017-09-20T23:11:49+5:302017-09-20T23:12:09+5:30
सिहोरा परिसरात चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करणारे कालवे व नहराची अवस्था डोकेदुखी वाढविणारी आहे.

कालव्यात कचरा ; पाणी वाटप अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करणारे कालवे व नहराची अवस्था डोकेदुखी वाढविणारी आहे. मुख्य डावा कालवा जागोजागी खोदल्याने दुरूस्ती केली नाही. याशिवाय कालव्यावर आऊटलेटचे कामे करित असताना कालवे व नहराची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. यामुळे पाणी वाटप अडचणीत येणार आहे.
चांदपूर जलाशयाचे पाणी सांभाळणाºया पाटबंधारे विभागात कर्मचाºयांचा अगोदरच वानवा आहे. उजवा व डावा कालव्यात डझनभर पदे रिक्त आहेत. तब्बल वर्षभरापर्यंत डाव्या कालव्यात शाखा अभियंताचे पद रिक्त होते. याच कालावधीत उजवा कालव्याचे शाखा अभियंता हटवार यांना उपविभागीय अभियंता पदाचा तुमसरात प्रभार देण्यात आला असता पाटबंधारे विभागाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. डावा कालव्यात सहायक शाखा अभियंता पदावर कार्यरत असणारे डिंकावार यांचेकडे उजवा आणि डावा कालावे अंतर्गत निधी खर्च व विकास कार्याची जबाबदारी दिली. याच कालावधीत सहायक शाखा अभियंता डिंकावार यांनी डावा कालव्यावर आऊटलेटचे बांधकाम केले. या आऊटलेट नजीक मुख्य कालव्याला भगदाड पडले असतानी त्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. या शिवाय विकास कामे सुरू असताना कावले आणि नहरांची स्वच्छता केलेली नाही.
टेलवर सिंचनासाठी पाणी पोहचत नाही
कर्कापूर शेतशिवाराचा पट्टा टेलवर आहे. याशिवाय अनेक गावातील शेतशिवार टेलवर असल्याने पाणी पोहचत नाही. कालवे आणि नहरात केरकचरा व झुडपे असल्याने पाण्याच्या प्रवाहाला गती प्राप्त होत नाही. यामुळे कालवे आणि नहरांची स्वच्छता करण्याची ओरड वारंवार शेतकरी करीत आहे. परंतु पाटबंधारे विभागाची यंत्रणा सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. पाणी उपलब्ध असताना शेती सिंचनापासून वंचित आहे.