पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 21:55 IST2019-01-16T21:54:54+5:302019-01-16T21:55:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्र्यांना गुरुवारी भंडारा येथे घेराव घालण्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ...

पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्र्यांना गुरुवारी भंडारा येथे घेराव घालण्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शेतकरी शेतमजूर आघाडीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहेत. त्यानंतरही जिल्ह्याची आणेवारी ५० पेक्षा अधिक आली. त्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या मदतीला मुकत आहेत. उघड्यावर असलेला धान पावसात ओला झाला. त्याला कोंब फुटले. परंतु आता तो धान खरेदी करण्यास पणन महासंघ नकार देत आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ज्या स्थितीत शेतकऱ्यांचा धान आहे. त्या स्थितीत तो खरेदी करावा, धान खरेदीचे पैसे तात्काळ द्यावे, यासोबतच ग्रामीण भागात शेती सिंचनासाठी केवळ आठ तास वीज पुरवठा करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांपुढे अडचणे निर्माण झाले आहे. या शेतकऱ्यांना १६ तास वीज पुरवठा करावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीची भंडारा येथे गुरुवार १७ जानेवारी सभा होत आहे. यासाठी पालकमंत्री भंडारा येथे येत आहे. त्यावेळी शेतकºयांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.