‘त्या’ वॉर्डाची पाणीपुरवठा योजना अधांतरी

By Admin | Updated: January 5, 2015 22:59 IST2015-01-05T22:59:17+5:302015-01-05T22:59:17+5:30

वॉर्डातील नागरीकांच्या पाणी पुरवठ्याची मागणी लक्षात घेत नगरपालिका प्रशासनाने एका दशकापूर्वी काही निवडक वार्डांसाठी पाणीपुरवठा योजना अंमलात आणली होती.

'The' Ward's Water Supply Plan | ‘त्या’ वॉर्डाची पाणीपुरवठा योजना अधांतरी

‘त्या’ वॉर्डाची पाणीपुरवठा योजना अधांतरी

भंडारा : वॉर्डातील नागरीकांच्या पाणी पुरवठ्याची मागणी लक्षात घेत नगरपालिका प्रशासनाने एका दशकापूर्वी काही निवडक वार्डांसाठी पाणीपुरवठा योजना अंमलात आणली होती. त्यासाठी जलकुंभ तयार करण्यात आले होते. त्या खाली बोरवेलची निर्मिती करायची, असा प्रस्ताव होता. मात्र निधीअभावी ही योजना गुंडाळल्याने नागरिकांना पाणी मिळालेच नाही.
भंडारा नगर पालिका हद्दीत एकूण ३२ वॉर्ड आहेत. पाणीपुरवठ्यासाठी शहरात पाच जलकुंभ आहेत. यात दोन मोठे तर तीन कमी क्षमतेचे जलकुंभ आहेत. हे जलकुंभ सिव्हील लाईन, रूग्णालय व पोलीस वसाहत परिसरात आहे. यात भर पडावी व लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या वॉर्डात पाण्याची अतिरीक्त सुविधा व्हावी या हेतूने नगर पलिका प्रशासनातर्फे एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. यात शहरातील काही निवडक वॉर्डामध्ये जलकुंभ तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
यासाठी जवळपास प्रत्येकी ४ लाखांचा खर्च अपेक्षित ठेवण्यात आला. या अंतर्गत राम मंदिर वॉर्ड परिसर, मोठा बाजार परिसर (पटेल पुरा वॉर्ड), बैरागी वाडा परिसरात ही योजना राबविण्याचे ठरविण्यात आले. नगर पालिकेत ठराव घेऊन त्या अनुषंगाने ‘वर्क आॅर्डर’ काढण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: 'The' Ward's Water Supply Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.