वैनगंगेला ‘इकॉर्निया’चा विळखा

By Admin | Updated: May 17, 2015 01:12 IST2015-05-17T01:12:40+5:302015-05-17T01:12:40+5:30

जीवनदायिनी म्हणून लाभलेल्या आणि जिल्ह्याला ९० कि़मी. चा विळखा घालून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला ‘इकॉर्निया’ नामक वनस्पतीने विळखा घातला आहे.

Wangnga's 'Econia' breaks | वैनगंगेला ‘इकॉर्निया’चा विळखा

वैनगंगेला ‘इकॉर्निया’चा विळखा

इंद्रपाल कटकवार भंडारा
जीवनदायिनी म्हणून लाभलेल्या आणि जिल्ह्याला ९० कि़मी. चा विळखा घालून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला ‘इकॉर्निया’ नामक वनस्पतीने विळखा घातला आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित झाले असून भविष्यात मानवी आरोग्याला धोका होण्याची शक्यता बळावली आहे. नदीच्या स्वच्छतेकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झालेच आहे परंतु नगरपालिका प्रशासनही गंभीर नसल्याचे दिसून आले आहे.
भंडारा नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे वैनगंगा नदीपात्रातून भंडाराकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मागील दोन महिन्यांपासून कारधाजवळील वैनगंगा नदीच्या पात्रात या इकॉर्निया वनस्पतीने शिरकाव केला आहे. पाहतापाहता या वनस्पतीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. ही वनस्पती विषयुक्त नसली तरी या वनस्पतीमुळे नदीपात्रातील जलचर प्राण्यांना त्याचा फटका बसत आहे. याशिवाय ज्याठिकाणी पाणी संथगतीने वाहते किंवा पाण्याचा प्रवाह थांबलेला आहे, अशा ठिकाणी ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या वनस्पतीमुळे पाण्याचे बाष्पीकरण होण्याचे प्रमाण वाढते. विशेषत: तलावात ही वनस्पती आढळते. परंतु नदीपात्रात या वनस्पतीने शिरकाव केल्यामुळे ही वनस्पती समूळ नष्ट करण्यासाठी नगरपालिकेला पुढाकार घेण्याची गरज आहे.
नागनदीच्या दूषित पाण्यामुळे वैनगंगा नदी प्रदूषित होत आहे. काही दिवसांपासून या नदीत इकॉर्निया ही वनस्पती वाढत आहे. वैनगंगा नदी प्रदूषित होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.
- बाबूराव बागडे,
नगराध्यक्ष भंडारा.
इकॉर्निया ही वनस्पती वैनगंगा नदीपात्रात आढळून आली आहे. या वनस्पतीपासून जलचरांना धोका आहे. त्यामुळे भविष्यातील समस्येच्या दृष्टीने या वनस्पतीचे उच्चाटन करण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येईल.
- रवींद्र देवतळे,
मुख्याधिकारी नगरपालिका भंडारा
मत्स्योत्पादन घटले
वैनगंगेचा प्रवाह थांबल्यामुळे त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. नदीचे दूषित पाणी मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत असतानाच जलचर प्राण्यांसाठी घातक ठरत आहे. वैनगंगा नदीतील मासोळ्याची दूरवर मागणी होती. परंतु नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे मासे मृत्यूमुखी पडत आहेत. त्याचा परिणाम मत्स्योत्पादनावर झालेला आहे.
विकार बळावले
नाग नदीसोबतच भंडारा शहरातील सांडपाणीसुद्धा वैनगंगा नदीला येऊन मिळत आहे. गोसेखुर्दमध्ये वैनगंगेचा प्रवाह थांबला आहे. परिणामी या दूषित पाण्याच्या उपयोगामुळे नागरिकांना चर्म विकार जडले आहेत. याशिवाय पोटाचे विकार फुफ्फुस आणि श्वसनाचे आजार बळावत आहेत. याला कारण वैनगंगा नदीचे दूषित झाले आहे.

Web Title: Wangnga's 'Econia' breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.