धापेवाडा प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: April 29, 2016 00:41 IST2016-04-29T00:41:23+5:302016-04-29T00:41:23+5:30
तिरोडा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळख असलेला धापेवाडा प्रकल्प वैनगंगा नदीवर कवलेवाडा

धापेवाडा प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा
नियोजनाचा अभाव : शेतकरी पाण्यापासून वंचितच
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळख असलेला धापेवाडा प्रकल्प वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे अदानी समूहाच्या व पाटबंधारे विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आला. ४४.०५ दलघमी (१५.५६ टी.एम.सी.) पाणी क्षमतेच्या या प्रकल्पात वैनगंगा नदीतील ३२७ द.ल.घ.मी. (११.५५ टी.एम.सी.) पाणी शेतीसाठी आहे. मात्र संबंधित यंत्रणेच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकऱ्यांना पाणीच मिळणे कठीण झाले आहे.
या प्रकल्पातून अदानी वीज प्रकल्पासाठी वार्षिक २.४७ टी.एम.सी. पाणीसाठा पुरवठा करण्यास शासनाने मंजूरी दिली. त्यानुसार पाणी पुरवठा केला जातो. पण शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कोणतेही नियोजन केले जात नाही. या प्रकल्पात पाणी भरले असल्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी कर्ज काढून पाईपलाईन करुन विद्युत पंप लावले. अनेक बेरोजगार शेतीकडे वळले. पण वैनगंगेत पाणीच नसल्याने संपूर्ण लावलेले रबी पीक जळून गेले आहे. लाखो रुपये खर्च करुनही हाती काहीच येणार नाही. उलट कर्जाचा बोझा वाढणार आहे. चांदोरी खुर्द, पिपरिया, सावरा, अर्जुनी, बिहिरीया, मुरदाडा, महालगाव, किडंगीपार, करटी बु., इंदोरा व इतर ठिकाणी बोअरवेलने उपसा केला जातो. (वार्ताहर)