शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

दोन वर्षांपासून लाभार्थी पिकविम्याच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:26 PM

आॅनलाईन लोकमतपालांदूर : सन२०१४-१५ व २०१५-१६ चे पिकविमा प्रकरण मंजूर होऊनही पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे शासनस्तरावर पात्र ठरूनही मागील दोन वर्षापासून नत्थू सीताराम खंडाईत या शेतकऱ्याची पायपीट सुरूच आहे. शेतकºयांचा कुणी वाली नाही का? असा प्रश्न ते लोकप्रतिनिधींना विचारत आहेत.शेतकºयाच्या नावावर विकासाच्या गप्पा मारणे सुरू असल्याचा आरोप त्यांनी ...

ठळक मुद्देपात्र लाभार्थी खंडाईतची पायपीट सुरुच

आॅनलाईन लोकमतपालांदूर : सन२०१४-१५ व २०१५-१६ चे पिकविमा प्रकरण मंजूर होऊनही पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे शासनस्तरावर पात्र ठरूनही मागील दोन वर्षापासून नत्थू सीताराम खंडाईत या शेतकऱ्याची पायपीट सुरूच आहे. शेतकºयांचा कुणी वाली नाही का? असा प्रश्न ते लोकप्रतिनिधींना विचारत आहेत.शेतकºयाच्या नावावर विकासाच्या गप्पा मारणे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकारणासाठी शेतकऱ्यांचा उपयोग केला जात असून त्याच्या विकासासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे वास्तव पालांदूर परिसरात दिसत आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत त्यांनी पिकविमा काढला होता.मागील दोन वर्षात लाखनी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत केला. आणेवारीच्या आकडेवारीवरून तत्कालीन प्रशासनाने पिकविमा मंजूर करीत सेवा सहकारी संस्थेमार्फत जिल्हा बँकेतून शेतकऱ्यांना पिकविमा मंजूर करीत सेवा सहकारी संस्थेमार्फत जिल्हा बँकेतून हजारो शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ देण्यात आला. मात्र त्याच कालावधीत ग्रामीण बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ दिला नाही.प्रगतशिल शेतकरी नत्थू खंडाईत यांनी या प्रकरणात जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांना लेखी तक्रार केली. उपनिबंधकांनी सदर प्रकरणाला न्याय देत अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया ला पत्र पाठवून मंजूर झालेली रक्कम शेतकºयांना देण्याचे सांगितले. परंतु आजपर्यंत खंडाईत यांना मदत मिळाली नाही.