तलावांना खोलीकरणाची प्रतीक्षा

By Admin | Updated: June 11, 2015 00:35 IST2015-06-11T00:35:35+5:302015-06-11T00:35:35+5:30

तलावांच्या जिल्ह्यात गाव तलाव अखेरची घटका मोजत असून शासनाने गाजावाजा करून जलयुक्त शिवार प्रत्येक शिवारात ...

Waiting for room for the ponds | तलावांना खोलीकरणाची प्रतीक्षा

तलावांना खोलीकरणाची प्रतीक्षा

शिवार योजना कागदावर
गावतलाव नामशेष होण्याच्या मार्गावर
तुमसर : तलावांच्या जिल्ह्यात गाव तलाव अखेरची घटका मोजत असून शासनाने गाजावाजा करून जलयुक्त शिवार प्रत्येक शिवारात पोहोचण्याकरिता प्रभावी अंमलबजावणीची खरी गरज दिसत आहे. देव्हाडी येथील गाव तलाव खोलीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. भर वस्तीशेजारी मोठा गाव तलाव पाण्याअभावी असल्याने पाणी संकट उभे झाले आहे.
तुमसर तालुक्यातील प्रत्येक गावात गाव तलाव, मामा तलाव तथा मध्यम व मोठे तलाव आहेत. शासन दप्तरी या गावात सिंचनाची व पाणी टंचाईची सामना करावा लागत नाही, असा अहवाल दरवर्षी शासनाला सादर केला जातो. बोटावर मोजण्याइतक्या गावात केवळ पाणी टंचाई आहे, असा अहवाल शासनाला पाठविला जातो. वनविभागही तलाव असल्याने जंगलात पाणवठे तयार करीत नाही. नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत आहे असा अहवाल शासनाला सादर करतात.
वास्तविक गाव तलाव, मामा तलाव अखेरची घटका मोजत आहेत. गाव तलाव व मामा तलाव शासनाच्या विविध योजनेत कागदोपत्री दुरुस्ती दाखविण्यात येतात असा अनुभव आहे. पाणी कुठे मुरत आहे हा संशोधनाचा विषय आहे. जलयुक्त शिवारात यावर्षी मोजक्या गावातच ही योजना राबविण्यात आली. प्रभावी लोकप्रतिनिधी तथा मोठ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या परिसरात यावर्षी कामे केली अशी माहिती आहे.
देव्हाडी येथे मूळ गावात गाव तलाव आहे. या तलावालाच सध्या पाण्याची गरज आहे. तलावाची पाळ एका बाजूने कुठे गायब झाली ती दिसत नाही. तलावाच्या सिमेंटच्या पायऱ्या करण्यात आल्या आहेत. वास्तविक या तलावाला खोलीकरण करून ती माती पाळीवर टाकण्याची गरज होती. पूर्व दिशेची पाळ मोठी व उंच आहे. ती कमी करून पश्चिम दिशेला नवीन पाळ तयार करण्याची गरज आहे. खोलीकरण केल्यामुळे शिवार जलयुक्त होऊन वर्षभर या तलावात पाणी साचले राहिल. कायम दुर्लक्ष येथे पदाधिकाऱ्यांचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Waiting for room for the ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.