पाणलोट पदाधिकाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा

By Admin | Updated: April 24, 2015 00:40 IST2015-04-24T00:40:37+5:302015-04-24T00:40:37+5:30

केंद्र शासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (आय.डब्लू.एम.पी.) कृषी विभागाच्या माध्यमातून प्रकल्पाची

Waiting for the postal authorities | पाणलोट पदाधिकाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा

पाणलोट पदाधिकाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा

भंडारा : केंद्र शासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (आय.डब्लू.एम.पी.) कृषी विभागाच्या माध्यमातून प्रकल्पाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी मानधन तत्वावर प्रकाय स्तरावर पाणलोट विकास पथक सदस्य व ग्रामस्तरावर पाणलोट सचिवाची निवड करण्यात आली. मात्र गेल्या तीन महिण्यापासून म्हणजेच जानेवारी २०१५ पासून ते आजपर्यंत मानधन अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर तसेच कुटुंबावर उपासमारीचे संकट निर्माण झालेआहे.
पाणलोट प्रकल्प राबविण्यासाठी कृषि विभागाच्या माध्यमातून मंडळ आणि तालुका स्तरावर प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणेची निर्मिती केली गेली. सदर यंत्रणा सांभाळण्यासाठी मुख्य धुरा पाणलोट विकास पथक सदस्य व पाणलोट समिती सचिव यांच्यावर आहे. मात्र आजपर्यंतचे मानधन न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पाणलोट विकास पथक सदस्य व ग्रामस्तरावरील पाणलोट सचिवांना खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मानधनाबाबत जिल्हास्तरावर वारंवार विचारणा केली असता आज करू, उद्या करू अशी उडवाउडवीची उत्तरे देवून आपले हात वर झटकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दर महिण्याच्या ५ तारखेच्या आत सर्व पाणलोट विकास पथक सदस्यांचे मानधन अदा करण्यात यावे असे प्रकल्प व्यवस्थापक तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांचे पत्र असतांना सुद्धा तशी कार्यवाही केली जात नाही. याला जबाबदार कोण? अशा बेजबाबदार व्यक्तिंवर कार्यवाही का केली जात नाही? असा प्रश्न जिल्ह्यातील सर्व पाणलोट विकास पथक सदस्य व सचिवांना पडला आहे.
जानेवारी २०१५ ते मार्च २०१५ पर्यंतच्या सर्व दैनंदिन्या आणि पेमेंट शिट असे सर्व प्रकारचे दस्तऐवज जिल्हास्तरावर सादर केल्यानंतरही मानधन अदा करण्यात टाळाटाळ केली जात आहे. अशा टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पाणलोट विकास पथक सदस्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे.
राज्यस्तरीय वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेकडून पाणलोट विकास पथक सदस्यांना वाढीव मानधन देण्यासंबंधी पत्र प्राप्त झाले असताना सुद्धा सदर पत्रांची अंमलबजावणी केली जात नाही.
सदर पत्राची तात्काळ अंमलबजावणी करावी व अडलेले मानधन त्वरीत अदा करण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील सर्व पाणलोट विकास पथक सदस्य व सचिवांवाकडून केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Waiting for the postal authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.