शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

दोन महिन्यांपासून धान मोजणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 06:00 IST

शासनाच्या आदेशाने नोव्हेंबरपासून जिल्ह्यात धान खरेदी सुरु झाली. सातही तालुक्यात धान हेच मुख्य पीक असल्याने संपूर्ण खरीप धानाचाच आहे. आधारभूत केंद्र अपुऱ्या सोईने सुरु झाले. तीन महिने संपत आले तरी आधारभूत केंद्र सेवेत परिपूर्ण नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे तोडगे कोठार व्यवस्था हेच खरे कारण आहे. इतक्या दिवसात अधिकारी व राज्यकर्त्यांना कोठार क्षमता कळली नाही.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : गोडाऊन हाऊसफुल्ल, धान उघड्यावर

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : धान खरेदीला अपेक्षित न्याय मिळत नसल्याने संपूर्ण जिल्ह्यातील आधारभूत केंद्रावर समस्या कायम आहेत. भरडाई आदेश, गोडाऊन क्षमता, बारदाना आदी समस्यांनी धान खरेदी केंद्र संकटात आली आहेत. कित्येक आधारभूत केंद्रावर दोन महिन्यापासून धान मोजणीच्या प्रतिक्षेत आहेत. धान उघड्यावर पडून आहेत.शासनाच्या आदेशाने नोव्हेंबरपासून जिल्ह्यात धान खरेदी सुरु झाली. सातही तालुक्यात धान हेच मुख्य पीक असल्याने संपूर्ण खरीप धानाचाच आहे. आधारभूत केंद्र अपुऱ्या सोईने सुरु झाले. तीन महिने संपत आले तरी आधारभूत केंद्र सेवेत परिपूर्ण नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे तोडगे कोठार व्यवस्था हेच खरे कारण आहे. इतक्या दिवसात अधिकारी व राज्यकर्त्यांना कोठार क्षमता कळली नाही. दरवर्षी तीच तीच समस्या घर करीत शेतकऱ्यांना संकटात आणते.या वर्षाला निसर्ग पाचवीलाच पुजल्याने नोव्हेंबरपासून जानेवारीपर्यंत पावसाने साथ सोडली नाही. जिल्ह्याभर पावसाने कहर करीत मोजणीच्या प्रतिक्षेतील धान अंकुरले. अंकुरलेले धान खरेदी होत नसल्याने पुन्हा शेतकरी समस्यात फसला. गोडाऊन फुल्ल असल्याने मोजणी थांबली आहे. भरलेली गोडाऊन रिकामी करण्याकरिता भरडाईचे आदेश मिलर्स ना खरेदी च्या तुलनेत मिळत नाही. त्यामुळे खरेदीला गती येत नाही. हे वास्तव सत्य जिल्हा मार्केटींगसह जिल्हाधिकाºयांना सुद्धा माहित आहे. मात्र मोजणीला गती नसल्याचे कारण समजून सुद्धा डीओ (भरडाई आदेश) का वाढवली जात नाही हे कळायला मार्ग नाही. उघड्यावर पडलेले धान मार्च इंडीग (शेवट) पर्यंत तरी मोजतील की नाही त्याची सुद्धा शाश्वती उरली नाही. दहा हजार क्विंटलल मागे केवळ एक हजार क्विंटलचे भरडाई आदेश मिळत असतील तर मोजणीला निश्चिंतच विलंब शक्य आहे. उघड्यावरील धानाची नासधूस व भुरट्या चोरांमुळे शेतकरी विंवचनेत आला आहे. शेतकºयाकडे स्वत:ची कोठार व्यवस्था नसल्याने हमी केंद्रासमोर धान चुरण्यापासून पडली आहेत. पावसाची टांगती तलवार असल्याने तात्पुरती कागदा (त्रिपाल)ची सोय करून धान मोजणीच्या प्रतिक्षेत आहेत.मार्केटिंग कार्यालयाच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे धान मोजणीला विलंब होत आहे. पालांदूर सेवा सहकारी सोसायटीच्या हमी केंद्रावर आतापर्यंत सुमारे ४६ हजार क्विंटल धानाची मोजणी झाली आहे. खासगीतील कोठार भाडेतत्वावर होऊन शेतकऱ्यांचा न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र भरडाई आदेश खरेदीच्या हिशोबाने न मिळाल्याने खरेदी प्रभावित झाली.-विजय कापसे, अध्यक्ष विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पालांदूर (चौ.)शेतकऱ्यांची अगतीकता बघता निसर्गाची अवकृपा अनुभवता जिल्हा मार्केटिंगने तात्काळ भरडाई आदेशाची गती वाढवावी. खरेदी व उचल यांचा ताळमेळ न जुळल्याने धान खरेदी रेंगाळली आहे. देवरी केंद्रावर केवळ एक हजार ते बाराशे क्विंटलची भरडाई आदेश मिळाले. आजही मोजलेला व बिगर मोजलेला धान निसर्गाच्या आधीन खुल्या पटांगणावर पडून आहे.-मोरेश्वर प्रधान, अध्यक्ष विविध सेवा सहकारी संस्था देवरी (गोंदी)

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड