उमरीवासीयांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा
By Admin | Updated: March 11, 2015 00:41 IST2015-03-11T00:41:42+5:302015-03-11T00:41:42+5:30
उमरी या छोट्याशा गावात एक ना अनेक समस्यांनी घर केलेला आढळतो. एक आठवडाभरापुर्वी आलेल्या पाण्याने सर्व प्रश्न चव्हाट्यावर उघडे पडले आहेत.

उमरीवासीयांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा
अड्याळ : उमरी या छोट्याशा गावात एक ना अनेक समस्यांनी घर केलेला आढळतो. एक आठवडाभरापुर्वी आलेल्या पाण्याने सर्व प्रश्न चव्हाट्यावर उघडे पडले आहेत. अजुन मृग नक्षत्राला पावसाळ्याला बरीच वेळ बाकी आहे.
अवकाळी पावसात गावात ही दशा तर पावसात कोणती गत राहत असणार. गावातील बहुतांश नाल्या तुंबलेल्या आहेत तर कुठे नाल्याचे बांधकाम अद्यापही आलेले नाही. परिणामत: दोन्ही कारणांमुळे गावातील लोकांना रस्त्यावरील सांडपाण्याला ओलांडून जाण्याची समस्या रोजच भेडसावत आहेत. त्या विषयी लेखी समस्या ग्रामपंचायत वारंवार देऊन सुद्धा येथील ग्रामपंचायत प्रशासन गाढ झोपेतच आहे. अशा वेळेला ग्राम पंचायत सदस्य व सरपंच संबंधीत वॉर्डाकडे दुर्लक्ष का करतो, त्याची मासिक सभेत दखल घेतली जाते कि त्या वॉर्डातील प्रश्नाची दखल घेतली जाऊ देत नाही.या विषयीची माहिती येथील सरपंचा सौ. शिलाताई भाऊराव चौधरी यांना विचारले असता तुंबलेल्या नाल्यांची सफाई व नवीन नाल्यांचे बांधकाम त्वरित करण्यात येईल असल्याची माहिती दिली.
त्याच प्रमाणे याच गावातील जि.प. शाळेतील क्रीडा पटांगणाला अवकाळी पावसाने तलावाचे स्वरूप आले होते. अशाच मुलांच्या असुविधामुळेच तर जि.प. शाळेतील पटसंख्या कमी होत नसणार, एक वर्षाआधी १८ जानेवारी २०१४ ला ठराव घेवून येथील जि.प. सदस्य युवराज वासनिक यांच्या शिफारशीनुसार २८ जानेवारी २०१४ ला क्रीडा जिल्हाधिकारी यांना हे लेखी माहिती पुरविण्यात आली होती. जिल्हा परिषद शाळेतील क्रिडा पटांगण वर्ष लोटून सुद्धा स्थिती तेच गावातील ४१ विद्यार्थी खेळासाठी यावेळी मात्र वेगळ्या नजरा फाळून पाहत उभी होती. येथील मुख्याध्यापक पी.एस. दहिवले यांच्या मते या विषयीची लेखी माहिती संबंधित विभागाला पाठविली आहे आणि या विषयी वारंवार बोलून बोलणार कुणाला, असे मत जि.प. शाळेतील उमरी गावातील मुख्याध्यापकांनी मांडले. (वार्ताहर)