शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

भूमिहीन कास्तकाराला सरकारजमा जमिनीची प्रतीक्षा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 17:15 IST

किटाडीतील प्रकरण : प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळेना!

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : कायद्यानुसार शेतकऱ्याला भूमिहीन करता येत नाही. तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरण नस्तीबद्ध केले. मात्र, शेतकऱ्याने हार न मानता विभागीय आयुक्तांकडे जमिनीचे सर्व दस्तऐवज पुरवीत, निवेदनातून साकडे घालत न्यायाची मागणी केली होती. त्याची दखल घेत विभागीय आयुक्त, नागपूर यांनी १५ मे २०२३ रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांना कारवाई करण्यासंबंधाने पत्र दिले आहे. वृद्ध शेतकरी मालकी हक्काच्या एक हेक्टर जमिनीच्या प्रतीक्षेत आहे. हा प्रकार लाखनी तालुक्यातील किटाडी येथील चंद्रभान मारोती हेडाऊ यांच्यासोबत घडला आहे. 

सन १९७५-७६ मध्ये सरकारी पट्टयासहित भूमापन क्रमांक ३२४, १०.११ हेक्टर आर. क्षेत्रफळातील एक हेक्टर काबिल कास्तकारी शासकीय वाटपात मिळाली. जमिनीचा सातबाराही नावावर झाला. १९९२ पर्यंत जमिनीची मशागत करून कुटुंबाचे पालनपोषण केले. पुढे दुष्काळ ओढवून नापिकी झाली. गरिबीमुळे पैशांची अडचण निर्माण झाली. त्यामुळे गावातील सावकाराकडून १९९३ साली पाच हजार रुपयांत तात्पुरती कसायला दिली. मात्र, सावकाराने १० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर शंभर वर्षांच्या ठेकेपत्राच्या आधारे कब्जा केला.

हे प्रकरण पोलिस ठाणे पालांदूरमार्फत उपविभागीय अधिकारी, साकोली यांच्या न्यायालयात न्यायप्रविष्ट होऊन गैरअर्जदाराने बनावट दस्तऐवजाच्या आधारे शेतजमिनीवर कायमस्वरूपी कब्जा केल्याचे न्यायालयीन निर्णयाद्वारे स्पष्ट झाले. एक हेक्टर शेतजमीन २०१६ साली शासनजमा करण्यात आली. सप्टेंबर- २०२१ मध्ये मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मोक्यावर पंचनामा केला असता, शेतजमीन मोकळी असल्याचे दिसून आले. १६ वर्षांपासून मालकी हक्काच्या काबिल कास्तकारीसाठी धडपड करूनही अद्याप न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता तरी महसूल प्रशासन लक्ष देणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सरकारी पट्टेदार असून गत १६ वर्षापासून प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून आयुष्याच्या या सांजवेळी जीव मेटाकुटीस आला आहे.वृद्धापकाळात कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी दुसरे काहीच साधन नाही. मायबाप सरकारने, पडीक असलेल्या काबिलकास्त जमिनीचा प्रशासनाने पूर्ववत कब्जा मिळवून द्यावा व म्हातारपणात जगण्यासाठी हक्काचा आधार मिळावा.- चंद्रभान हेडाऊ, भूमिहीन शेतकरी, किटाडी 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा