मजुरांना बोनसची प्रतीक्षा
By Admin | Updated: September 3, 2015 00:24 IST2015-09-03T00:24:36+5:302015-09-03T00:24:36+5:30
२०१२ ते २०१५ पर्यंत जांब कांद्री व लेंडेझरी वनपरीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ११ गावात तेंदूपाने संकलन करणाऱ्या अंदाजे ५,३३७ मजुरांना बोनसपासून वंचित आहेत.

मजुरांना बोनसची प्रतीक्षा
तेंदूपान तोडणी : मजुरांनी दिला आंदोलनाचा इशारा
उसर्रा : २०१२ ते २०१५ पर्यंत जांब कांद्री व लेंडेझरी वनपरीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ११ गावात तेंदूपाने संकलन करणाऱ्या अंदाजे ५,३३७ मजुरांना बोनसपासून वंचित आहेत.
घाम गाळून अतिदुर्गम भागातील मजूर तेंदूपाने संकलन करण्याचा काम करतो. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातर्फे सदर योजना राबविली जाते. अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेंडेझरी वनपरीक्षेत्रा अंतर्गत आदिवासी मजूराकडून सन २०१२ पासून ते सन २०१५ पर्यंतचे गरीब मजुरांचे बोनस आजपर्यंत मिळाले नसल्याची तक्रार सदर मजुरांनी जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक भंडारा विभागीय आयुक्त नागपूर आमदार चरण वाघमारे, तहसीलदार तुमसर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सन २०१२ पासून आजपर्यंत खालील गावातील गरीब मजूरांचे बोनस मिळाले नाही. यासंदर्भात सर्व ५,३३७ मजूरांच्या स्वाक्षऱ्या घेवून बपेरा आंबागडचे उपसरपंच ईश्वरदयाल बंधाटे यांनी दि.१२ सप्टेंबरपर्यंत बोनस मिळाला नाही.
मागील तीन वर्षापासून अनेकदा सदर विभागाला तक्रारी नोंदविल्या. लोकप्रतिनिधींना कळविले पण उपयोग झाला नाही. आता पैसे न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा बपेराचे उपसरपंचईश्वरदयाल बंधाटे यांनी दिला आहे. (वार्ताहर)