आंदोलन हिंसक होण्याची वाट पाहू

By Admin | Updated: July 3, 2016 00:27 IST2016-07-03T00:27:08+5:302016-07-03T00:27:08+5:30

विदर्भ राज्य आघाडीचे ध्येय केवळ विदर्भ राज्य मिळविणे हे असून हा लढा सरकारला त्यासाठी मजबूर करण्यासाठी आहे.

Wait for the movement to become violent | आंदोलन हिंसक होण्याची वाट पाहू

आंदोलन हिंसक होण्याची वाट पाहू

विदर्भ राज्य आघाडीची सभा : नीरज खांदेवाले यांचा इशारा
भंडारा : विदर्भ राज्य आघाडीचे ध्येय केवळ विदर्भ राज्य मिळविणे हे असून हा लढा सरकारला त्यासाठी मजबूर करण्यासाठी आहे. आमचा हिंसक आंदोलनावर विश्वास नाही. कारण ही संतांची भूमी आहे. अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. परंतु प्रसंगी जनता रस्त्यावरही उतरू शकते. याची जाणीव सरकारने ठेवावी. तसेच सरकारने आमचे आंदोलन हिंसक होण्याची वाट न पाहता स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी, असा सूचक इशारा विदर्भ राज्य आघाडीचे सचिव अ‍ॅड. नीरज खांदेवाले यांनी दिला.
विदर्भ राज्य आघाडी, भंडारा जिल्हातर्फे सार्वजनिक वाचनालय, येथे आयोजित स्वतंत्र विदर्भ राज्यासाठीच्या जाहीर सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, १ मे २०१५ रोजी या आघाडीची स्थापना अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली.
प्रा. अनिल जवादे म्हणाले, जनतेला संविधानीक अधिकार बहाल करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. परंतू आजपर्यंत सत्तेतील नेत्यांनी तसे होऊ दिले नाही. कारण त्यांना दर पाच वर्षांनी जनतेकडून मतांची भीक मागावी लागते आणि मतदार मताचे त्यांना दान करते हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्यासाठी आपला अधिकार आणि आपल्या मताची किंमत व महत्व जनतेने समजून घेतले पाहिजे.
शेतकरी नेते श्रीकांत तराळ म्हणाले, विदर्भाची मागणी जुनी असली तरी आजची परिस्थिती वेगळी आहे. सरकारने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विदर्भातील मामा तलावाच्य विकासाकरीता एकही पैसा खर्च केला नाही. परिणामी येथील शेती बिनभरोशाची झाली. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. श्रीहरी अणे यांचे हे आंदोलन अराजकीय स्वरूपाचे आहे आणि त्यामुळे सरकार तसेच राजकारण्यांमध्ये त्यांच्या नावाची धडकी भरली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्ते त्याविषयी सजग राहणे गरजेचे आहे. सरकारने राजकारणासाठी जनतेला वापरू नये तर राजकाण जनतेच्या हितासाठी करावे.
सभेचे संयोजक रमाकांत पशिने यांनी तर संचालन केशव हुड यांनी केले. आभार अ‍ॅड. जयेश बोरकर यांनी मानले. यावेळी विदर्भ राज्यावरील स्वलिखित कविता कवी मार्कंड नंदेश्वर यांनी वाचले. जाहीर सभेसाठी अविनाश पनके, सुनिल जोशी, अ‍ॅड. अनंत गुप्ते, शशांक जोशी, भुमीपुत्र देवदास गभणे, अरविंद ढोमणे, मार्कंड नंदेश्वर यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी रमेश व्यवहारे, मार्कंड नंदेश्वर, अ‍ॅड. मधुकर वडेटवार, अरविंद ढोमणे, स.वा. मोहतुरे, रामदास महाकाळकर, रमेश तलदार, मधुबाला पशिने, मंजुषा बुरडे, गायत्री पंचबुद्धे, अनिता बोरकर, प्रितल बांते, धनराज सावठणे, विजय घोडमारे, शरद साकुरे, नरेंंद्र कटकवार, राहूल बडोले, खैरातीलाल, विजयकुमार दुबे, भा.श. जोगेकर, अशोक निमकर, गणेश धांडे, अ‍ॅड. सतीश ठवकर, प्रमोद काटेखाये, इंद्रकुमार राही, रमेश ढोमणे, विजय बडगुजर, साकोली येथील पदाधिकारी राकेश भास्कर, प्रविण भांडारकर, दिपक जांभुळकर, बाळू गिऱ्हेपुंजे, चंद्रकांत वडीचार, प्रविण डोंगरवार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Wait for the movement to become violent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.