वैनगंगा सफाई अभियान
By Admin | Updated: May 12, 2014 23:20 IST2014-05-12T23:20:23+5:302014-05-12T23:20:23+5:30
दरवर्षी प्रमाणे यंदाही भंडारा शहराला लगत असलेल्या वैनगंगा नदी पात्र तसेच नदी घाटाच्या स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली.

वैनगंगा सफाई अभियान
भंडारा : दरवर्षी प्रमाणे यंदाही भंडारा शहराला लगत असलेल्या वैनगंगा नदी पात्र तसेच नदी घाटाच्या स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानात यंदा वैना स्वमी व स्पोर्टस् अँकेडमी तसेच तैराकी मित्र मंडळ व लाखनी येथील निसर्गप्रेमींनी स्वयंस्फूर्तीने भाग घेतला. अभियान पावसाळ्यापर्यंत राबविण्यात येणार आहे. भंडारा शहरातील तसेच परिसरातील गावातील मृत लोकांच्या अस्थि वैनगंगा नदीत नित्याचे विसर्जन करण्यातयेतात. तसेच सार्वजनिक उत्सवातील गणपती, दुर्गादेवी, कानोबाचे विसर्जन वैनगंगेच्या पवित्र जलामध्ये करण्यात येते. विसर्जनासाठी वापरण्यात येणारा कारधा येथील हनुमान घाटावरील पात्रात कचरा साचून असते. नदीपात्रात जिकडे तिकडे देवादिकांचे फोटे, प्लॉस्टीकच्या पिशव्या तसेच इतर घाण वस्तू साचून असतात. परिणामी नदीपात्रातील संपूर्ण पाणी दुषित झाले आहे. भंडारा शहरात तसेच परिसरातील गावांमध्ये या पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्यात येतो. दुषित पाणी पिल्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता बळावते. ही एक गंभीर बाब असून या संबंधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने नदीपात्र स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यात वैना स्वमी व स्पोर्ट अँकेडमीच्या विद्यार्थी राजेंद्र मेश्राम, पारस शक्तीकर, कृणाल शक्तीकर, विशाल लिमजे, सोनू धारगावे, हर्ष सोनवाने, बादल कटकवार, श्रेयस ठवरे, जय बावनकुळे, राजेश वंजारी, रोशन निंबार्ते, सिद्धेश चिखलीकर आदींनी अँकेडमीचे अध्यक्ष प्रा.योगेश शक्तीकर यांच्या निदर्शनास स्वच्छता अभियानात सहभाग अभियानात सहभाग घेतला. लाखनीचे निसर्गप्रेमी डॉ.निंबार्ते, महादेव गायधने, मारोती भुरे, संजय बडवाईक, सोनू चोले, संदीप भिवगडे, दिलीप ढोमणे, छोटू निंबेकर इत्यादींनी भाग घेतला. नदीपात्र स्वच्छता अभियान दरम्यान एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वैना स्वीम व स्पोर्ट्स अँकेडमी, तैराकी मित्र मंडळ तसेच निसर्गप्रेमीतर्फे सर्व जनतेला नदीपात्र दुषित न करण्यासंबंधी आवाहन करण्यात आले. टाकावू वस्तू, मूर्ती व इतर साहित्याचे विसर्जन नदीपात्रात न करता हनुमान घाटावर असलेल्या मोकळ्या जागेत घालावे तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देवून नदीवरील लहान व मोठय़ा पुलाच्या मध्ये एका नवीन घाटाची निर्मिती करून द्यावी, जेणेकरून नागरिकांना विसर्जन करण्यासाठी गैरसोय होणार नाही. (प्रतिनिधी)