शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबर रोजी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील नऊ लाख ९१ हजार ८९० मतदारांपैकी सहा लाख ७१ हजार ८२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात तीन लाख ४४ हजार ३३४ पुरुष आणि तीन लाख २७ हजार ४८७ महिला मतदारांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे६७.७३ टक्के मतदान : २०१४ च्या तुलनेत ३.२४ टक्के मतदान कमी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती केल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत तिनही मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात ६७.७३ टक्के मतदानाची नोंद झाली असून २०१४ च्या तुलनेत ३.२४ टक्के कमी मतदान झाले. जिल्ह्यात साकोली मतदारसंघात सर्वाधिक ७१.१६ तर सर्वात कमी भंडारा येथे ६२.५५ टक्के मतदान झाले. ग्रामीण भागात मोठा उत्साह दिसत असला तरी शहरी भागात निरुत्साह दिसून आला.भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबर रोजी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील नऊ लाख ९१ हजार ८९० मतदारांपैकी सहा लाख ७१ हजार ८२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात तीन लाख ४४ हजार ३३४ पुरुष आणि तीन लाख २७ हजार ४८७ महिला मतदारांचा समावेश आहे. पुरुषांची मतदानाची टक्केवारी ६८.९६ तर महिलांची टक्केवारी ६६.४८ आहे.तुमसर विधानसभा मतदारसंघात ७०.४६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तीन लाख दोन हजार ९२३ मतदानांपैकी दोन लाख १३ हजार ४४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात एक लाख ९ हजार ६२३ पुरुष आणि एक लाख तीन हजार ८२२ महिला मतदारांचा समावेश आहे. पुरुषांची टक्केवारी ७१.५४ तर महिलांची टक्केवारी ६९.३६ आहे. भंडारा मतदारसंघात जिल्ह्यात सर्वात कमी ६२.५५ टक्के मतदारांनी मतदाराचा हक्क बजावला. तीन लाख ७० हजार ५७४ मतदारांपैकी दोन लाख ३१ हजार ७९३ मतदारांनी मतदान केले. त्यात एक लाख २० हजार ४२ पुरुष आणि एक लाख ११ हजार ७५१ महिला मतदारांचा समावेश आहे. साकोली विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७१.१६ टक्के मतदानाची नोंद झाली. तीन लाख १८ हजार ३९३ मतदारांपैकी दोन लाख २६ हजार ५८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात एक लाख १४ हजार ६६९ पुरुष आणि एक लाख ११ हजार ९१४ महिला मतदारांचा समावेश आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा निवडणुकीचा टक्क घसरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ३.२४ टक्के मतदान गत वेळीच्या तुलनेत यंदा कमी झाले आहे. त्यात तुमसर ०.९८, भंडारा ५.६७ आणि साकोलीत २.५४ टक्के मतदान कमी नोंदविण्यात आले आहे. २०१४ च्या निवडणुकीत ७०.९७ टक्के मतदान झाले होते. नऊ लाख १७ हजार ६२२ मतदारांपैकी सहा लाख ९१ हजार २६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तुमसर विधानसभा क्षेत्रात ७१.४४, भंडारात ६८.२३ आणि साकोलीत ७३.७० टक्के मतदान नोंदविण्यात आले होते. यावेळी प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांसह शासकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतरही शहरी भागात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून येत आहे.६ लाख ७१ हजार ८२१ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्कसाकोलीत सर्वाधिक तर भंडाऱ्यात सर्वात कमीजिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. ७१.१६ टक्के मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. तर भंडारा विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी म्हणजे ६२.५५ टक्के मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच मतदानाबाबत उत्साह दिसून येत होता. भंडारा शहरात मतदानाच्या शेवटच्या तासात पाऊस कोसळल्याने टक्केवारी घसरल्याचे सांगितले जाते. मात्र सकाळपासूनच भंडारा विधानसभा क्षेत्रात मतदानाची गती संथ होती. सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ १.३० टक्के आणि शेवटच्या दोन तासात २.९२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्षविधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष २४ ऑक्टोबर रोजी होणाºया मतमोजणीकडे लागले आहे. गावागावांत मतदानाचा टक्केवारीवरुन आकडेमोड करुन कोण विजयी होईल. याचे गणित लावले जात आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस बहुउद्देशिय सभागृहात तर तुमसर येथे आयटीआय ईमारतीत तर साकोली येथे तहसीलच्या नविन इमारतीत मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात आली असून मतमोजणी कक्षाच्या परिसरात प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आला आहे. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत किंवा मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत हा आदेश लागु राहील.

टॅग्स :bhandara-acभंडारा