विद्यार्थ्यांची विधिमंडळाला भेट

By Admin | Updated: December 26, 2016 01:00 IST2016-12-26T01:00:07+5:302016-12-26T01:00:07+5:30

संसदीय शासनव्यवस्था, लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा कारभार कसा चालतो हे प्रत्यक्ष पाहण्याकरिता नागपूर येथील

Visit the Student's Legislature | विद्यार्थ्यांची विधिमंडळाला भेट

विद्यार्थ्यांची विधिमंडळाला भेट

शिक्षणमंत्र्यांनी दिली पुस्तके भेट : विद्यार्थ्यांशी केला संवाद
तुमसर : संसदीय शासनव्यवस्था, लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा कारभार कसा चालतो हे प्रत्यक्ष पाहण्याकरिता नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनाची माहिती जाणून घेण्याकरिता जनता विद्यालयाचे ५० विद्यार्थी तथा शिक्षकांनी भेट दिली. भेटीदरम्यान दोन्ही सभागृहाचे कामकाज पाहून राज्याचे शिक्षणमंत्र्यांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला.
तीन महिन्यापूर्वी जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी राज्याच्या सचिवालयाला पत्र पाठवून विधीमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभा व विधानपरिषदेची कारवाी पाहण्याची मंजूरी मागितली होती. त्या अनुषंगाने सचिवालयातून शाळेचे मंजुरीचे पत्र प्राप्त झाले होते. विदर्भातून केवळ सहा शाळांना मंजूरी मिळाली होती.
विधानसभा व विधानपरिषदेत प्रत्येकी अर्धा तास विद्यार्थ्यांनी तथा शिक्षकांनी प्रत्यक्ष कारवाईचे निरीक्षण केले. संसदीय शासनपद्धतीत प्रत्यक्ष कारवाईचे नियम कसे असतात याची माहिती जाणून घेतली. प्रश्नोत्तरे तासाची माहितीचे सभागृहाची कारवाई त्यांनी पाहिली.
प्रशासनाची माहिती जाणून घेतली. दरम्यान राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विधीमंडळ दालनात भेट घेतली. ना.तावडे यांनी विद्यार्थ्यांना शामची आई, एपीजे अब्दुल कलाम तथा इतर मान्यवरांचे जीवनचरित्राची पुस्तके देऊन विद्यार्थी व मुख्याध्यापक हेमंत केळवदे, पर्यवेक्षक एस.एन. लंजे, पी.एम. नाकाडे, पंकज बोरकर, राजू गभने, सार्वेसह इतर शिक्षकांशी संवाद साधला. भंडारा जिल्ह्यात भेटीदरम्यान जनता विद्यालयाला भेटीचे नियंत्रण विद्यार्थी व शिक्षकांनी ना.तावडे यांना दिले. ना.तावडे यांनी निमंत्रण स्वीकारून नक्की येणार असे आश्वासन दिले. सुमारे चार तास विधीमंडळ परिसरात विद्यार्थ्यांनी घालविले. (तालुकाप्रतिनिधी)

Web Title: Visit the Student's Legislature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.