देशातील धरणग्रस्तांची मेंढा पुनर्वसनला भेट
By Admin | Updated: November 25, 2014 22:51 IST2014-11-25T22:51:43+5:302014-11-25T22:51:43+5:30
पूर्ण भारतातून आलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणाला व मेंढा पुनर्वसन गावाला भेट देवून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, आंदोलनामुळे पुनर्वसनाच्या

देशातील धरणग्रस्तांची मेंढा पुनर्वसनला भेट
गोसेबुज : पूर्ण भारतातून आलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणाला व मेंढा पुनर्वसन गावाला भेट देवून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, आंदोलनामुळे पुनर्वसनाच्या कामाला आलेली गती, आंदोलने व पुनर्वसन पॅकेज वाटपाची माहिती जाणून घेतली. हे प्रतिनिधी राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, तामिळनाडू, ओडीसा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, महाराष्ट्र आदी राज्यातून आले होते.
या प्रतिनिधींनी गोसीखुर्द धरणाला भेट देवून धरणाच्या प्रगती विषयी माहिती जाणून घेतल्यानंतर मेंढा पुनर्वसन येथे आगमन होताच गावकऱ्यांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
सुरवातीला सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत तागडे यांनी गोसीखर्दु धरणाची प्रगती व प्रकल्पग्रस्तांच्या संपूर्ण आंदोलनाची विस्तृत माहिती या प्रतिनिधींना दिली. संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे झालेले फायदे, अडचणी विषयी माहिती देवून प्रकल्पग्रस्तांच्या पुढेही होणाऱ्या आंदोलनावर प्रकाश टाकला. राजस्थानचे खेमराज भाई, तामीलनाडूचे सेल्वराज, आंध्रप्रदेशचे सतदेवा, बिहारचे संतोष उपाध्याय व कैलाश भारती, झारखंडचे अरविंद अंजूम, मध्यप्रदेश राज्यातील अमित भाई व रायगडच्या उल्का महाजन यांनी प्रकल्पग्रस्तांना प्रश्न विचारून संपूर्ण माहिती जाणून घेतली.
स्थानिक प्रकल्पग्रस्त माजी उपसरपंच दादा आगरे, प्रल्हाद मेश्राम, देवराम आगरे, पोर्णिमा कांबळे आदींनी या प्रतिनिधींना माहिती दिली. याप्रसंगी प्रकाश मेश्राम, गुला मेश्राम, गणेश आगरे, हरी आगरे, मंगरू मेश्राम, झिबल गणवीर, समीक्षा गणवीर, गौतम मेश्राम, ढेकल मेश्राम, वच्छला शेंडे, दिपक आगरे, सुनिता आगरे, सपना आगरे, प्रमिला तागडे, अविनाश कांबळे, सचिन कांबळे आदींसह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (वार्ताहर)