कुंभली परिसरात विषाणूजन्य तापाची साथ
By Admin | Updated: September 4, 2014 23:35 IST2014-09-04T23:35:14+5:302014-09-04T23:35:14+5:30
जिल्ह्यात ठिकठिकाणी विषाणूजन्य तापाची साथ असून वेगवेगळ्या तापाच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कुंभली व परिसरातील गावांमध्ये सुद्धा रुग्णांची संस् था दिवसेंदिवस वाढत आहे.

कुंभली परिसरात विषाणूजन्य तापाची साथ
कुंभली : जिल्ह्यात ठिकठिकाणी विषाणूजन्य तापाची साथ असून वेगवेगळ्या तापाच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
कुंभली व परिसरातील गावांमध्ये सुद्धा रुग्णांची संस् था दिवसेंदिवस वाढत आहे. डोके दुखणे, ताप येणे, उलटी होणे, शरीर दुखणे इत्यादी लक्षणामुळे कावीळ, टायफाईड, विषमज्वर इत्यादी रोगांची उत्पत्ती होत असून या आजाराबरोबर डेंग्यू या तापाने लोकांना हैराण करून सोडले आहे. सावरबंध, बोंडे येथे डेंग्यू तापाचे रुग्ण आढळले असून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजाराची वाढ होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
खड्यांमध्ये साचलेले पाणी, फवारणीचा अभाव, जनजागृतीचा अभाव यामुळे रोगांवर नियंत्रण न मिळवता उलट डासांचा प्रकोप वाढत आहे. काही रुग्ण जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा सरकारी रुग्णालयात उपचार न घेता प्रायव्हेट दवाखान्यात उपचार घेत असल्यामुळे सरकार दप्तरी रुग्णांची नोंद बरोबर होत नाही.
त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेनी जलदगती कामाला लागणे आवश्यक आहे. तरच जागृती होईल. या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी गावागावात आरोग्य शिबिर लावणे, धुर फवारणी करणे, रोगप्रतिबंधक लस देणे इत्यादी उपाय तातडीने करण्याची गरज आहे. विषाणुजन्य आजाराच्या लागणने नागरिक हैराण झाले असून हा आजार वाढत असल्याने त्यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाने याची दखल घेवून उपाययोजना कराव्यात. (वार्ताहर)