लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : धनेगाव येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत नळ योजना मंजूर झाली परंतु नियमबाह्य केलेल्या विस्तारीकरणामुळे नळ योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे. गावाबाहेर वस्ती नसताना विस्तारीकरण करुन शासनाच्या निधीचो दुरुपयोग होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.धनेगाव येथे मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत नळ योजना मंजूर करण्यात आली. या योजनेकरिता ३४ लाख रुपये खर्चासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत गावात विविध कामे करण्यात येत असली तरी ही कामे नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून वारंवार होत आहे. त्यामुळे या योजनेच्या कामांना गावात जोरदार विरोध सुरु झाला आहे. धनेगाव गावामध्ये गावकऱ्यांना नळ कनेक्शन उपलब्ध करण्याकरिता रस्त्याचे एका बाजुला पाईपलाईनचे काम करण्यात येत आहेत. गावात सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आल्याने दुतर्फा नागरिकांची घरे आहेत. नागरिकांना नळ कनेक्शन उपलब्ध करतांना सिमेंट रस्ता फोडून पाईपलाईनचे काम करावे लागणार आहे.गावातच नागरिकांची वस्ती असतांना फक्त ३५० मीटर पाईप लाईनचे कामे गावात करण्यात आली आहेत. पाईप लाईन विस्तरीकरण गावाबाहेर करण्याऐवजी गावातच ही पाईप लाईन केली असती तर नागरिकांना अधिक फायद्याची ठरली असती असे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.गावकऱ्यांचा नळ योजनेच्या कामांना विरोध नसून यंत्रणेच्या मनमानी कारभाराचा निषध करण्यासाठी विरोध करण्यात येत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले. गावात नळ योजनेची जुनी ओरड असतांना गावकºयांनी वस्ती योजनेच्या कामांची चौकशीची मागणी केली आहे.गावातील नळ योजनेच्या कामांना गावकऱ्यांचा विरोध नाही. ३५० मीटर विस्तारीत पाईप लाईनच्या कामांना विरोध आहे. नळ योजनेचा लाभ नागरिकांना योग्य प्रकारे झाला पाहिजे.- मनोज पटले, उपसरपंच, धनेगावनळ योजनेचे काम योग्य दिशेने सुरु आहे. योजनेचे काम करताना लहान मोठ्या असणाऱ्या समस्या समन्वयातून सोडविल्या जातील.- छगनलाल पारधी, माजी सरपंच,
नळ योजनेच्या कामाला गावकऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:01 IST
धनेगाव येथे मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत नळ योजना मंजूर करण्यात आली. या योजनेकरिता ३४ लाख रुपये खर्चासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत गावात विविध कामे करण्यात येत असली तरी ही कामे नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून वारंवार होत आहे. त्यामुळे या योजनेच्या कामांना गावात जोरदार विरोध सुरु झाला आहे.
नळ योजनेच्या कामाला गावकऱ्यांचा विरोध
ठळक मुद्देधनेगाव येथील प्रकार : वस्ती नसताना पाईप लाईनचे काम