स्मशानभूमीत पोहचण्यासाठी गावकऱ्यांना रस्ताच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:33 IST2019-09-01T00:33:20+5:302019-09-01T00:33:47+5:30
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात स्मशानभूमी रस्ता आणि पुल बांधकामाची मुख्य समस्या आहे. नाल्यालगत असणाºया या स्मशानभूमित मृतदेह नेण्याकरिता रस्ता नसून अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची फरपट होत आहे. या नाल्यात सदैव पाणी साचून राहत असल्याने तीन ते चार फुट पाण्यातून चक्क गावकºयांना पे्रत न्यावे लागत आहे.

स्मशानभूमीत पोहचण्यासाठी गावकऱ्यांना रस्ताच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील बिनाखी गावाचे नाल्या शेजारी असणाºया स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता आणि पुलाचे बांधकाम करण्यात आले नसल्याने पावसात नागरिकांना गुडघाभर पाण्यातून मृतदेहाासह प्रवास करावा लागत आहे.
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात स्मशानभूमी रस्ता आणि पुल बांधकामाची मुख्य समस्या आहे. नाल्यालगत असणाºया या स्मशानभूमित मृतदेह नेण्याकरिता रस्ता नसून अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची फरपट होत आहे. या नाल्यात सदैव पाणी साचून राहत असल्याने तीन ते चार फुट पाण्यातून चक्क गावकऱ्यांना पे्रत न्यावे लागत आहे. रस्ता आणि पुल बांधकामाची गावकऱ्यांची जुनी मागणी आहे. परंतु या मागणीला केराची टोपली दाखवण्यात येत आहे. प्रशासन गावकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.
गावाशेजारी दुसरी स्मशानभूमि नसल्याने भर पावसात चिखल तुडवत स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जावे लागते. स्मशानभूमीत कित्येक वर्शांपासून रस्ता, पुलाचे बांधकाम झाले नसल्याने अन्य सुविधा प्रभावित झाल्या आहेत. पिण्याचे पाणी, सभामंडप, हातपंप आदी सुविधा नाहीत. या सुविधांसाठी ग्रामपंचायत मार्फत अनेक वेळा ग्रामसभेत ठराव देवूनही परिस्थिती जैसे थे दिसत आहे. गावकºयांनी सर्वानुमते घेतलेल्या ठरावाची ठरावाची साधी दखल घेण्यात आलेली नाही. शासन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने गावकºयांनी प्रशासनाविरोधात लवकरच आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.