शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

नळयोजनेसाठी गावकरी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

सरपंचाने विचारपूस करताच कंत्राटदाराने गावकºयांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गावकरी नळयोजनेच्या कामासाठी एकत्र आले आहेत. गावात नळयोजनेअंतर्गत पाईपलाईनचे खोदकाम करताना एक फूट अंतर खोलीचे खोदकाम करण्यात आले आहे. गावात टाकीचे बांधकाम करण्यात आले असले तरी टाकीभोवती कोणतेही कुंपण करण्यात आलेले नाही. पाणी पुरवठा करण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आली आहे.

ठळक मुद्देधनेगावचे प्रकरण : ३५ लाखांच्या योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील धनेगाव येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ३५ लाख रूपयांचा नळ योजनेच्या कामात अनियमीतता होत असल्याच्या अरोप करीत गावकरी कंत्राटदाराविरोधात एकवटले आहे. गावात कंत्राटदाराने कामाला सुरूवात केली तरी अनेक ठिकाणी गुणवत्तापूर्ण काम केले नसल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.धनेगाव येथे मुख्यमंत्री ग्राम पेयजल योजनेंतर्गत सुरू असलेल्या नळ योजनेच्या कामात अनियमितता झाल्याने २६ जानेवारीची ग्रामसभा वादळी ठरली. गावकऱ्यांनी सरपंचाकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाकडून या कामाची दखल घेण्यात आली. मात्र तरीही २६ जानेवारीच्या ग्रामसभेत नळयोजनेचा विषय गावकऱ्यांनी उचलून धरला.सरपंचाने विचारपूस करताच कंत्राटदाराने गावकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गावकरी नळयोजनेच्या कामासाठी एकत्र आले आहेत.गावात नळयोजनेअंतर्गत पाईपलाईनचे खोदकाम करताना एक फूट अंतर खोलीचे खोदकाम करण्यात आले आहे. गावात टाकीचे बांधकाम करण्यात आले असले तरी टाकीभोवती कोणतेही कुंपण करण्यात आलेले नाही. पाणी पुरवठा करण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आली आहे. मात्र बोरवेलमधील पाणी हे पिण्यासाठी शुद्ध नसल्याने पाणी फिल्टर करणे गरजेचे आहे. बोरवेलमधून उपसा करणाऱ्या मोटरपंप किती एचपीचे आहे याची साधी पुसटची कल्पनादेखील ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आलेली नाही.गावात वस्ती असताना नळयोजनेचे काम चांगले दर्जेदार पद्धतीने होणे गरजेचे होते. असे असताना कंत्राटदाराकडून गावाबाहेर अर्धा किलोमीटर अंतरावर कोणतीही वस्ती नसताना पाईपलाईनचे खोदकाम करण्यात आले आहे. अर्धवट कामे करून कंत्राटदार सदर योजनेतून पैसे उकळण्याचे काम करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.पेयजल योजना ही ग्रामवकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी असली तरी कंत्राटदार अर्धवट कामे करून फक्त निधी उचलण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा गावकऱ्यांत सुरु आहे. त्यामुळे गावकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.ग्रामसभेत एकमताने सदर कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून पुन्हा एकदा नवीन कंत्राटदाराकडून नळ योजनेचे काम करण्यासाठी गावकरी ठाम आहेत. कंत्राटदाराचे कंत्राट त्वरीत रद्द न केल्यास माजी सरपंच छगनलाल पारधी यांच्या नेतृत्वात उपोषण करण्याचा ईशारा गावकऱ्यांनी दिला आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे काम करत नसून गावकऱ्यांशी मुजोरी करीत असल्याने गावकरी कंत्राटदाराविरोधात ग्रामसभेत एकमताने ठराव घेणार आहेत.

टॅग्स :Waterपाणी