ग्रामस्थांना वेठीस धरण्याचा डाव
By Admin | Updated: September 16, 2016 01:24 IST2016-09-16T01:24:52+5:302016-09-16T01:24:52+5:30
मांगली चौरास येथे २९ आॅगस्ट रोजी ग्रामसभेत काही गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सचिवाला मारहाण करून

ग्रामस्थांना वेठीस धरण्याचा डाव
भंडारा : मांगली चौरास येथे २९ आॅगस्ट रोजी ग्रामसभेत काही गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सचिवाला मारहाण करून शासकीय दस्तावेज फाडला असा आरोप करून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. ही तक्रार तथ्यहीन असून राजकीय द्वेषभावनेतून आम्हाला फसविण्यात येत असल्याचा आरोप ग्रामसभेच्या अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अनुसया मधु पडोळे यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.
पवनी तालुक्यातील मांगली येथे २९ आॅगस्ट रोजी ग्रामसभेत तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदाची निवडणूक होती. त्यासाठी हनुमान मंदिरात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ठरल्यानुसार गावकरी उपस्थित होते. परंतु सभास्थळी विद्युत व पंख्याची सुविधा नसल्यामुळे ही सभा दुसऱ्या ठिकाणी घेण्यात यावी, अशी गावकऱ्यांची मागणी होती मात्र गावात दोन गट असल्याने सरपंचांना दुसरे स्थळ मान्य नव्हते़
ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी ६ उमेदवारांनी अर्ज केला होता़ त्यामुळे आपल्याच उमेदवाराची अध्यक्षपदी निवड व्हावी, अशी इच्छा असल्याने स्थळ बदलविण्यासाठी सरपंच्यानी विरोध करून ते सभेतून निघून गेले़ त्यामुळे सचिवाने दुसऱ्यास्थळी सभा घेतली़. सभा सुरळीत पार पडली त्यात कुठलाही गोंधळ किंवा हाणामारी झाली नाही़ गावकऱ्यांच्या स्वाक्षरी घेताना एकमेकांच्या प्रोसेडिंग बुकची ओढताण झाली, परंतु प्रोसिडींग किंवा कोणतेही दस्तावेज फाटले नाही़ खुद्द सचिवांनी दिलेले प्रोसीडींग बुक फाटलेले नसल्याचे पत्रपरिषदेत दाखविण्यात आले.
सचिवाचे सरपंचांशी सलोख्याचे संबध असून काही दिवसापुर्वी रेतीघाटाच्या रस्त्यावरून बिनसल्यामुळे बदनाम करण्याचा कट रचून आणि खोटा आरोप लावून पोलीस ठाण्यात तक्रारी करून पुरूषोत्तम वैद्य, खुशाल वैद्य, डागेश्वर पडोळे यांचेविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले़ हा त्यांना बदनाम करण्याचा कट आहे़
मांगलीचे ग्रामसेवक दत्ता जाधव हे सरपंचाच्या गटाचे असून विरोधी गटाचा अध्यक्ष झाल्याने सचिव हा कर्मचारी युनियनला अंधारात ठेवून सर्व गावकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ग्रामविकासाची कामे ठप्प झाली आहेत़ त्यामुळे प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या ग्रामसेवक दत्ता जाधव यांना सेवेतून निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. अन्यथा रस्त्यावर येऊन जनआंदोलन करण्याचा ईशारा सुरेंद्र आमतुलवार, तेजराम वैद्य, अतुल मुलतलवार, के.डी. मोटघरे, हिरालाल वैद्य, गोवर्धन बावनकर, मनोरमा भुरे, डागेश्वर पडोळे, हिरालाल वैद्य यांनी दिला. (जिल्हा प्रतिनिधी)