गाव ठाणा, फलक निहारवाणीचे

By Admin | Updated: May 10, 2014 02:25 IST2014-05-10T00:03:38+5:302014-05-10T02:25:43+5:30

राष्ट्रीय महामार्गालगत ठाणा पेट्रोलपंप या स्थळी दुसर्‍याच गावाचे दर्शनी फलक लावण्यात आले. परिणामी राष्ट्रीय

Village Thana, Plaque Niharvani | गाव ठाणा, फलक निहारवाणीचे

गाव ठाणा, फलक निहारवाणीचे

जवाहरनगर : राष्ट्रीय महामार्गालगत ठाणा पेट्रोलपंप या स्थळी दुसर्‍याच गावाचे दर्शनी फलक लावण्यात आले. परिणामी राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत दिलीप बिलकॉमद्वारे रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील पारडी नाकापासून ते भंडारा जिल्ह्यातील मुजबीपर्यंत नव्वद टक्के विविध कामे करण्यात आले. मात्र रस्त्यालगत असलेली व रस्त्यापासून दोन्ही दिशेने असलेल्या गावांचे दिशादर्शक लावलेले नव्हते, यामुळे महामार्गावरील प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होतो. याची दखल लोकमतने फलक लावण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आज हे फलक पूर्ण लावण्यात आले.चौकोणी चार ते पाच फुट आकाराच्या फलकावर महामार्गापासून दोन्ही दिशेने दोन ते दहा किलोमीटर अंतराचे गावांचे दिशा लहान बाणाद्वारे उल्लेखीत करण्यात आले. या महामार्गालगत असलेली गावांची फलके ही दोन ते तीन फुट छोट्या आकाराच्या दर्शनी फलकावर मोठ्या आकाराच्या बाणाने दाखविण्यात आले. मात्र राष्ट्रीय महामार्गालगत भंडारा तालुक्यातील ठाणा पे.पंप येथे भंडार्‍याहून नागपूर दिशेने जाताना व नागपूरहून भंडार्‍याकडे जाताना जुना ठाणा ग्रामपंचायतजवळ दोन फलक लावण्यात आले आहे. या दोन ते तीन फुट आकाराच्या फलकावर मोठ्या बाणाने नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील निहारवाणी या गावाचे नाव दर्शविण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे ठाणा पे.पंप राष्टÑीय महामार्गापासून उत्तर दिशेने दीड ते दोन किलोमीटर अंतरावर निहारवाणी हे गाव आहे. परिणामी रात्री अपरात्री येणार्‍या प्रवाशांना ठाणा गाव कोठे आहे हे कळत नाही. यापूर्वी शहापूर-ठाणा पे.पंप दरम्यान नाल्यावर तालुक्याबाहेरची ‘सुरनदी’ अवतरली होती. हे फलक अद्याप लावलेले आहे. याबाबत विचारणा केली असता महसूल विभागाच्या नकाशावरुन लिहिण्यात आले असे सांगण्यात आले. प्रश्न येथे असा आहे की साठ ते सत्तर वर्षापूर्वी वसलेले ठाणा पे.पंप हे गाव महसुल विभागाच्या नकाशावर नाही का? नुकतेच नव्याने साकोली तालुक्यात भेल कंपनी स्थापित झाली. सुरू होण्याची प्रतिक्षा आहे. मात्र त्यांचे दर्शनी फलक पारडी नाकापासून मुजबीपर्यंत प्रत्येक गावामध्ये किलोमीटर अंतर दर्शविणारे फलक लागले कसे हे न समजणारे एक कोडे आहे. संबंधित वरिष्ठ विभागाने याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.(वार्ताहर)

 

Web Title: Village Thana, Plaque Niharvani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.