गावाचा विकास हेच आमचे ध्येय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:32 IST2021-03-08T04:32:40+5:302021-03-08T04:32:40+5:30
सासरा : साकोली तालुक्यातील कटंगधरा-न्याहारवानी येथील गटग्रामपंचायतची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मतदारांनी शिवशक्ती पॅनलला झुकते माप दिले. ...

गावाचा विकास हेच आमचे ध्येय
सासरा : साकोली तालुक्यातील कटंगधरा-न्याहारवानी येथील गटग्रामपंचायतची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मतदारांनी शिवशक्ती पॅनलला झुकते माप दिले. सत्ता परिवर्तनाचा व ग्रामविकासाचा मुद्दा पुढे करून या पॅनलने सातही जागा जिंकून सरपंच पदाची माळ उशिका शेंडे व उपसरपंच पदाची माळ डिगंबर रुखमोडे यांच्या गळ्यात घालून या पॅनलचे विजयी उमेदवार आदेश मेश्राम, जयगोपाल मलखांबे, निराशा रुखमोडे, छाया थेर, व रोहिणी शेंडे या सर्वांवर ग्रामविकासाची धुरा देण्यात आली.
विजयोत्सव साजरा करताना सरपंच उशिका शेंडे व उपसरपंच डिगंबर रुखमोडे यांनी ग्रामविकास हेच आमचे ध्येय राहील अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या पॅनलला यशस्वी करण्यासाठी डी. एल. चांदेवार, हरी रुखमोडे, आनंदराव दरवडे, रमेश रुखमोडे व इतरांनी सहकार्य केले.