विजय भुरे पुरस्काराने सन्मानित

By Admin | Updated: September 15, 2016 00:33 IST2016-09-15T00:33:56+5:302016-09-15T00:33:56+5:30

महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख असोसिएशनच्या वतीने गुणवंत केंद्र प्रमुखांना सन्मानित करण्यात आला.

Vijay Bhurer honored in the award | विजय भुरे पुरस्काराने सन्मानित

विजय भुरे पुरस्काराने सन्मानित

गुणवंत केंद्र प्रमुख : जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
भंडारा : महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख असोसिएशनच्या वतीने गुणवंत केंद्र प्रमुखांना सन्मानित करण्यात आला. हा पुरस्कार भंडारा जिल्ह्यातील तावशी केंद्राचे केंद्र प्रमुख विजय भुरे यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते पुणे येथे देण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याला मावळचे आ. बाळा भेगडे, जि.प. अध्यक्ष प्रदीप कुंद, राज्य अप्पर सचिव माने, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात, राज्य सचिव अप्पासाहेब पुल, राज्य केंद्र प्रमुख असोसिएशनचे अध्यक्ष रामराव जगदाळे, शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख, उपशिक्षणाधीकारी वनवे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे दिलीप गभने आदी उपस्थित होते. भुरे यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांचे संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद आदींनी कौतुक केले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Vijay Bhurer honored in the award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.