शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Video: तीन तासांच्या प्रयत्नानंतर अस्वल पळाली जंगलात, भंडारा वनविभागाची यशस्वी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 16:22 IST

पवनी तालुक्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येथील किटाडी फाटा येथील गावालगतच्या झुडपात अस्वल असल्याची माहिती वनविभागाला रविवारी सकाळी मिळाली.

भंडारा : गाव हद्दीत शिरलेल्या एका मादी अस्वलाला जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यात वन विभागाला यश आले आहे. तीन तासांपर्यंत चाललेली ही  कारवाई रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पवनी तालुक्यातील अड्याळ येथील किटाडी फाटा शिवारालगत करण्यात आली. यावेळी घटनास्थळी उपवनसंरक्षकांसह यांसह वनविभागाचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.

पवनी तालुक्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येथील किटाडी फाटा येथील गावालगतच्या झुडपात अस्वल असल्याची माहिती वनविभागाला रविवारी सकाळी मिळाली. या मादी अस्वलाला आरआरयू पथक व अड्याळ येथील वन कर्मचाऱ्यांसह जेसीबी व फटाक्‍यांचा वापर करून गाव शिवारात शिरू न देण्याचा प्रयत्न सुरू केला. तसेच त्या अस्वलाला जंगलाकडे जाण्यास प्रवृत्त करण्याकरिता उपाय योजना केली. गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला लांब अंतराहून हिरवी नेट लावण्यात आली होती. तसेच सुरक्षित अंतरावरून अस्वलाला जंगलाच्या दिशेने पळून जाण्याकरिता हालचाल करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ व वाहनांमुळे तिला अडथळा होऊ नये, म्हणून पर्यायी व्यवस्था अंतर्गत केमिकल रेस्क्यूची पण तयारी करण्यात आली होती. परंतु त्याची आवश्यकता भासली नाही. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अस्वल फटाक्यांच्या आवाजाने झुडपातून बाहेर निघाले. परंतु नागरिकांचा जमाव व आवाजाने ती परत झुडपात शिरली. वन विभागाच्या पथकाने प्रयत्न सुरूच ठेवले. शेवटी अस्वलाला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावण्यात वन विभागाला यश आले. 

 

या कारवाईदरम्यान उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, सहाय्यक वनसंरक्षक वाय. बी. नागुलवार, भंडाराचे वनपरिक्षेत्रअधिकारी विवेक राजूरकर, अड्याळ वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे, आरआरयू पथकाचे अनिल शेळके , नीलेश श्रीरामे, धनिराम पातोडे, अड्याळ वनविभागाचे विनोद पंचभाई यासह अन्य कर्मचारी व वनरक्षक उपस्थित होते. 

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलVidarbhaविदर्भ