आज फडकणार विदर्भाचा झेंडा
By Admin | Updated: May 1, 2016 00:18 IST2016-05-01T00:18:29+5:302016-05-01T00:18:29+5:30
वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात अॅड. श्रीहरी अणे यांच्या सक्रियतेनंतर ांदोलने व जनजागृती सभा घेतल्या गेल्या त्यात प्रचंड लोकसहभागी झाले.

आज फडकणार विदर्भाचा झेंडा
भंडारा : वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात अॅड. श्रीहरी अणे यांच्या सक्रियतेनंतर ांदोलने व जनजागृती सभा घेतल्या गेल्या त्यात प्रचंड लोकसहभागी झाले. भंडारा विदर्भ राज्य आघाडी व विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारा घोषित आंदोलनानुसार १ मे रोजी भंडाऱ्यात त्रिमूर्ती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येईल. विदर्भवादी काळी फिती लावून महाराष्ट्रदिनाचा निषेध करुन वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देण्यात येणार आहे. विदर्भ राज्याला विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, वकील यांच्यासह विदर्भवादी संघटनांनी व कार्यकर्त्यांनी समर्थन दिले आहे. (प्रतिनिधी)