आपादग्रस्तांची ताडपत्री झाली उंदरांचे भक्ष्य!

By Admin | Updated: December 10, 2014 22:51 IST2014-12-10T22:51:10+5:302014-12-10T22:51:10+5:30

सिंदपुरी येथील आपातग्रस्त नागरिकांच्या मदतीकरिता जिल्हा परिषद अंतर्गत ७६ ताडपत्री पुरवठा करण्यात आल्या. मात्र ताडपत्रीचे वाटप करण्यात आले नसल्याने उंदरांचे भक्ष्य ठरत आहेत.

The victims of the victims of rage | आपादग्रस्तांची ताडपत्री झाली उंदरांचे भक्ष्य!

आपादग्रस्तांची ताडपत्री झाली उंदरांचे भक्ष्य!

सिंदपुरी येथील प्रकार : ताडपत्रींचे वाटप नाही
रंजित चिंचखेडे - चुल्हाड (सिहोरा)
सिंदपुरी येथील आपातग्रस्त नागरिकांच्या मदतीकरिता जिल्हा परिषद अंतर्गत ७६ ताडपत्री पुरवठा करण्यात आल्या. मात्र ताडपत्रीचे वाटप करण्यात आले नसल्याने उंदरांचे भक्ष्य ठरत आहेत. यामुळे गावात संतापाची लाट आहे.
अडीच हजार लोकवस्ती तथा पंचायत समिती क्षेत्र असलेल्या सिंदपुरी गावात माल गुजारी तलावाची पाळ ऐन पावसाळ्यात फुटली असता विसर्ग होणारे पाणी गावात शिरले होते. २३ जुलै च्या रात्री या पाण्यामुळे गावकरी संकटात आले. संपूर्ण गावात पाणीच पाणी असल्याने अनेक घरे बाधीत झाली. गावातील २११ कुटुंबे रस्त्यावर आली होती. अनेकांची घरे खचली तर काही घरे भुईसपाट झाली. गावकऱ्यांवर संकट कोसळल्याने शासकीय यंत्रणा मदतीला धावून आली.
स्वयंसेवी संस्थांनी गावात तळ ठोकून मदतीत हातभार लावला. अन्न, धान्य, कापड तथा जिवनावश्यक वस्तुचा पुरवठा आपातग्रस्तांच्या मदतीकरिता पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यातील उद्योजकांनी तात्पुरते टिनाचे शेड उभारणी साठी पुढाकार घेतला. या टिन शेड मध्ये २५ कुटुंब वास्तव्य करित आहेत. मदतीला अनेक हात धावून आल्याने आपतग्रस्तांचे संसार पुर्ववत सुरु होण्यास सिंहाचा वाटा आहे. परंतु या मदतीत जिल्हा परिषदेचा कृषी व पशु संवर्धन विभाग अपवाद ठरला आहे.
या विभागअंतर्गत आपातग्रस्तांच्या मदतीकरिता ७६ ताडपत्री पुरवठा करण्यात आली आहेत. २ आॅगस्ट ला प्राप्त झालेल्या ताडपत्रीचे अद्याप वाटप करण्यात आले नाही. सभापती संदिप ताले यांनी गावकऱ्यांना स्वत: ताडपत्रीचे वाटप करणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे ह्या ताडपत्री व्यापारी संकुलनाच्या खोलीत ठेवण्यात आलेल्या आहेत. या व्यापारी संकुलाच्या दारांना कुलूप ठोकण्यात आले आहे. या कुलूपांच्या चाव्या सैरवैर आहेत.एक चावी सभापती संदिप ताले आणि दुसरी चावी ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांकडे आहे. ताडपत्री वाटपाचे अधिकार ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांना असतांना सभापती ताले यांची प्रतिक्षा करण्यात येत आहे. चावी त्यांच्याकडे असून ताडपत्री वाटपाचे निर्देश जिल्हा परिषदच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने अद्याप दिले नाही. असे पदाधिकारी सांगत आहेत. यामुळे ताडपत्री वाटप करण्यात आले नाहीत.
या वादात ७६ ताडपत्रींना उंदरांनी भक्ष्य बनविले आहे. अनेक ताडपत्रींना उंदिरांनी कुतरल्याने छिद्र तयार झाली आहेत. पावसापासून संरक्षण देणारे ताडपत्री उपयोगीता विना नेस्तनाबुत होत आहेत. सामान्य जनतेच्या करामधून या ताडपत्र्याची खरेदी झाली आहेत. ह्या ताडपत्री वाटपासाठी कुणी पुढाकार घेत नही. दरम्यान टिनाच्या शेड मध्ये वास्तव्य करणारी कुटुंब बहुतांश शेतकरी आहेत. या कुटुंबियांना संरक्षण आहे. परंतु जनावरे दिवस रात्र उघड्यावर बांधण्यात येत आहेत. पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे जनावरांचे शेड तयार करण्यास आपातग्रस्तांना अडचण येत आहे. ताडपत्री वाटपाने शेतकऱ्यांच्या जनावरांना मोठा आधार मिळणार आहे. कृषी व पशु संवर्धन विभाग सोबत ताडपत्री वाटप करून ग्राम पंचायत पदाधिकारी पंगा घेण्याच्या तयारीत नाहीत. सभापती संदिप ताले यांना ताडपत्री पुरवठ्याला ४ महिण्याचा कालावधी पुर्ण होत असताना वाटपासाठी वेळ मिळत नाही. यामुळे व्यापारी संकुलाच्या चाव्या हरविल्याची चिंता गावकऱ्यात निर्माण झाली आहे. या ताडपत्र्यांचे सध्या तरी कुणी मायबाप नसल्याने उंदीरांना सोने पे सुहागा ठरत आहेत.

Web Title: The victims of the victims of rage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.