रेल्वे फाटकाला वाहनाची धडक

By Admin | Updated: June 29, 2017 00:42 IST2017-06-29T00:42:10+5:302017-06-29T00:42:10+5:30

तुमसर - गोंदिया राज्य मार्गावर देव्हाडी रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे फाटकाला एका मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली.

Vehicle Stops | रेल्वे फाटकाला वाहनाची धडक

रेल्वे फाटकाला वाहनाची धडक

तासभर वाहतूक ठप्प : वाहन चालकाविरूद्ध कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर - गोंदिया राज्य मार्गावर देव्हाडी रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे फाटकाला एका मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. यामुळे तासभर वाहतूक रखडली होती. ही घटना बुधवारला दुपारी घडली.
तुमसर - गोंदिया राज्य मार्गावर रेल्वे फाटक क्र.५३२ रेल्वे वाहतुकीमुळे बंद होती. बंद फाटकाला चारचाकी (एम.एच. ३६ एफ ३७७५) ने जोरदार धडक दिली. या धडकेत रेल्वे फाटकाचे दोन तुकडे झाले. दरम्यान फाटक तुटल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाहतूक थांबविली. दोन्ही बाजूला लांब अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रेल्वे कर्मचारी प्रदीप मिश्रा यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी फाटक दुरुस्ती केली. तासभरानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. रस्ता अरूंद असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी रहदारी सांभाळली. त्यानंतर चालकाविरुद्ध रेल्वे अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे रेल्वे कर्मचारी प्रदीप मिश्रा यांनी सांगितले.
या रेल्वे फाटकावर कायमस्वरुपी उपाययोजना येथे करण्यात आली नाही. रेल्वे फाटकाजवळ वाहने येथे उभी केली जातात. दुचाकीस्वार फाटकाच्या खालून वाहने सर्रासपणे काढण्या प्रकार दररोज असतो.

Web Title: Vehicle Stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.