रेल्वे फाटकाला वाहनाची धडक
By Admin | Updated: July 11, 2015 01:38 IST2015-07-11T01:38:59+5:302015-07-11T01:38:59+5:30
अज्ञात चारचाकी वाहनाने देव्हाडी (तुमसर रोड) येथील रेल्वे फाटकाला धडक दिली. यात फाटकाचे दोन तुकडे झाले.

रेल्वे फाटकाला वाहनाची धडक
तुमसर : अज्ञात चारचाकी वाहनाने देव्हाडी (तुमसर रोड) येथील रेल्वे फाटकाला धडक दिली. यात फाटकाचे दोन तुकडे झाले. यामुळे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर सुमारे दोन तास वाहतूक बंद पडून वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. अज्ञात वाहनाच्या विरोधात रेल्वे प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी (तुमसर रोड) येथे रेल्वे फाटक क्र. ५३२ आहे. शुक्रवारी दु. ३ वाजता येथे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. यात एका अज्ञात वाहनाने रेल्वे फाटकाला धडक दिली. यात फाटकाचे दोन तुकडे झाले. यामुळे सुमारे दोन तास वाहतुक ठप्प झाली. फाटकाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रेल्वे प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करुन वाहतूक सुरळीत सुरु केली. (तालुका प्रतिनिधी)