वाहनाची रेल्वे फाटकाला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 00:19 IST2017-05-13T00:19:57+5:302017-05-13T00:19:57+5:30

रेल्वे फाटक बंद असतांनी एका मालवाहक वाहनाने रेल्वे फाटकाला जोरदार धडक दिली.

Vehicle rider hit | वाहनाची रेल्वे फाटकाला धडक

वाहनाची रेल्वे फाटकाला धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रेल्वे फाटक बंद असतांनी एका मालवाहक वाहनाने रेल्वे फाटकाला जोरदार धडक दिली. मध्यभागातून फाटकाचे दोन तुकडे पडून मालवाहक वाहन रेल्वे ट्रॅकवर शिरले. दरम्यान रेल्वेगाडीला उशीर होता. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाहनाला तात्काळ ट्रॅकवरुन दूर केले. संबंधित वाहनचालका विरोधात रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. सदर घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास देव्हाडी रेल्वे फाटकावर घडली.
मालवाक वाहन क्रमांक एम एच ३६ एफ १२४६ तुमसरवरुन तिरोड्याकडे जात होते. देव्हाडी रेल्वे क्रॉसींग क्रमाक ५३२ रेल्वे फाटक बंद होती. मालवाहक वाहनाने फाटकाला जोरदार धडक दिली. या धडकेत फाटकाचे दोन तुकडे पडले. मालवाहक वाहन धडक मारुन पुढे गेले. रेल्वेगाडीची वेळ झाली होती. प्रसंगावधान ओळखून रेल्वे कर्मचारी धावून आले. त्यांनी मालवाहक वाहनाला रेल्व ट्रॅकच्या बाहेर काढले.
सुमारे एक तास रेल्वे फाटक बंद होती. रस्त्याच्या दुतर्फी वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाहनाच्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन फाटक पूर्ववत दुरुस्त केली. रेल्वे कर्मचारी प्रदीप मिश्रा, अरुण विंग, पांडू इत्यादींनी फाटक वेळेत दुरुस्त करुवाहनचालकावर रेल्वे अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली. देव्हाडी येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. दोन्ही बाजुला अ‍ॅप्रोच रस्ता तयार करणे सुरु आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरु आहे. जड वाहनांची या मार्गावर मोठी वाहतूक आहे. दर तीन मिनीटांनी रेल्वे फाटक येथे बंद होते. त्यामुळे अनेकदा येथील फाटकाला वाहनांची सातत्याने धडक बसते. फाटक बंद असतांनी अनेक दूचाकीचालक फाटकातून दूचाकी येथे सर्रास काढतात. यामुळे अपघाताची शक्यता नेहमीच राहते. यावरुन मार्ग काढण्याची गरज आहे.

Web Title: Vehicle rider hit