शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेच्या लायसन्स निलंबन कारवाईने वाहनधारक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 05:00 IST

गत वर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असतानाही जिल्ह्यात जिल्हा वाहतूक शाखेने २०१९ मध्ये ४९५ वाहनधारकांवर तर  नवीन वर्षात ९६ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. यामध्ये मोबाईलवर बोलणारे १५७ वाहनधारक तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या ३३५ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. रेड सिग्नल जम्पिंगमध्ये जानेवारी महिन्यात चार तर ड्रंक अँड ड्राईव्ह केसेसमध्ये जानेवारी महिन्यात ५ तर फेब्रुवारी महिन्यामध्ये एक नोव्हेंबरमध्ये एक अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. 

ठळक मुद्दे५९१ वाहनधारकांवर कारवाई : शहरात मोहीम आणखी तीव्र

संतोष जाधवरलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा वाहतूक शाखेतर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५९१ वाहनधारकांवर लायसन्स निलंबन तसेच वाहतूक परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारक चांगलेच धास्तावले आहेत. गत वर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असतानाही जिल्ह्यात जिल्हा वाहतूक शाखेने २०१९ मध्ये ४९५ वाहनधारकांवर तर  नवीन वर्षात ९६ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. यामध्ये मोबाईलवर बोलणारे १५७ वाहनधारक तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या ३३५ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. रेड सिग्नल जम्पिंगमध्ये जानेवारी महिन्यात चार तर ड्रंक अँड ड्राईव्ह केसेसमध्ये जानेवारी महिन्यात ५ तर फेब्रुवारी महिन्यामध्ये एक नोव्हेंबरमध्ये एक अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. नवीन वर्षात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी फिरते पथक तैनात केले आहे.  त्यामुळे नववर्षात अवघ्या दोन महिन्यात ९६ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.  यामध्ये मोबाईलवर बोलत वाहने चालविणाऱ्या २९ वाहनधारकांवर, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६७ वाहनधारकांवर तर सिग्नल तोडणाऱ्या चौघांवर कारवाई झाली आहे. गत वर्षभरात नियम मोडणाऱ्या तब्बल सात हजार २३१ वाहनांवर वाहतूक शाखेच्या इंटरसेप्टर वाहनातर्फे कारवाई करण्यात आली होती. या वाहनधारकांना ४७ लाख ११ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम सुरू केल्याने नागरिकांनीही आता धास्ती घेतली आहे. 

वाहन चालविताना लायसन्स आवश्यक अनेक पालक आपल्या पाल्यांना दुचाकी घेऊन देतात मात्र १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच अनेक जण दुचाकीसाठी आपल्या पालकांकडे हट्ट धरतात. नाईलाजाने पालक पाल्यांना गाडी देतात. मात्र आता वाहतूक पोलिसांकडून लायसन्स विना फिरणाऱ्या दुचाकी धारकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. यासोबतच मालवाहू गाडीतून प्रवासी वाहतूक करताना आढळल्यास त्यांचा वाहतूक परवानाही रद्द करण्यात येत आहे. त्यासोबतच कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन न केल्यास आढळून आल्यास अशा धारकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. 

शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करणे सुरू आहे. भंडारा शहरात कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी  नागरिकांनीही पोलिसांना अपेक्षित सहकार्य करण्याची गरज आहे.-शिवाजी कदम, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा, भंडारा

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस