सामान्य रुग्णालयात वाहनधारकांची ‘लूट’
By Admin | Updated: April 11, 2015 00:27 IST2015-04-11T00:27:10+5:302015-04-11T00:27:10+5:30
आपण सर्वसामान्य कुटुंबातील असाल व उपचारासाठी किंवा रूग्णाला भेटायला जिल्हा सामान्य रूग्णालयात वाहनाने जात असाल तर जाऊ नका.

सामान्य रुग्णालयात वाहनधारकांची ‘लूट’
प्रकरण सायकल स्टॅण्डचे : गोरगरिबांची लुबाडणूक तरीही रुग्णालय प्रशासन गप्प
प्रशांत देसाई भंडारा
आपण सर्वसामान्य कुटुंबातील असाल व उपचारासाठी किंवा रूग्णाला भेटायला जिल्हा सामान्य रूग्णालयात वाहनाने जात असाल तर जाऊ नका. कारण रूग्णालय प्रशासनाने सायकल स्टँडच्या नावावर रूग्णांची पर्यायाने त्यांच्या वाहनधारक नातेवाईकांची ‘लूट’ चालविली आहे. सामान्यांसाठी आधार ठरु पाहणारे हे रुग्णालय पिळवणूक करणारे ठरत आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयाने उपचारासाठी येणारे रूग्ण किंवा त्यांच्या वाहनधारक नातेवाईकांकडून सायकल स्टँडच्या नावाने बळजबरीने लूट सुरू केली आहे.
शुल्क घेतात परंतु जबाबदारी नाकारतात
खासगी संस्थेला सायकल स्टँडची जबाबदारी दिलेली आहे. मात्र, संस्थेने जे पावती बुक छापले त्यावर जिल्हा सामान्य रूग्णालय असे नमूद आहे. सोबतच वाहन चोरीला गेल्यास त्याची जबाबदारी संस्थेची राहणार नाही, असे स्पष्टपणे पावतीवर नमूद आहे. संस्था जबाबदारी स्वीकारत नसल्यास सायकल स्टँडची गरज काय? दररोज शेकडो वाहनधारक रूग्णालयात येतात. त्यामुळे या संस्थेने काही गौडबंगाल केले तरी त्याची जबाबदारी रूग्णालयाची राहणार आहे.
रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून रूग्णालय परिसरात अस्ताव्यस्त वाहने लावण्यात येत होती. त्यामुळे रूग्णवाहिका काढण्यात किंवा अन्य महत्त्वाची वाहने काढताना अडचणी निर्माण यायच्या. त्यावर नियंत्रणासाठी सायकल स्टँड सुरू करण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर होणाऱ्या रूग्णाच्या हेडसांडबाबत माहिती नाही, माहिती काढून सांगेल.
- सुनीता बढे
निवासी वैद्यकीय अधिकारी, सामान्य रूग्णालय भंडारा.