वाहनाची खांबाला धडक

By Admin | Updated: May 2, 2016 00:32 IST2016-05-02T00:32:29+5:302016-05-02T00:32:29+5:30

डी.जे. वाद्याच्या वाहनाने रस्त्याच्या शेजारील खांबाला धडक देऊन उलटले. या अपघातात वाहनातील तिघे जण गंभीर जखमी झाले.

The vehicle hit the pole | वाहनाची खांबाला धडक

वाहनाची खांबाला धडक

तीन जण गंभीर : डोंगरी - नाकाडोंगरी मार्गावरील घटना
तुमसर : डी.जे. वाद्याच्या वाहनाने रस्त्याच्या शेजारील खांबाला धडक देऊन उलटले. या अपघातात वाहनातील तिघे जण गंभीर जखमी झाले. गोबरवाही येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात रविवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास डोंगरी बु. ते नाकाडोंगरी मार्गावर घडला.
डी.जे. वाद्यांचे वाहनाने नाकाडोंगरी परतीच्या मार्गावर डोंगरी बु. ते नाकाडोंगरी दरम्यान खांबाला धडक दिल्याने वाहन उलटले. या अपघातात कमलेश कटारे (३२), निकेश कटारे (२६) व कमलेश भुरे (१५) रा.नाकाडोंगरी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर तिघांना प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तिघांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.
या अपघाताची तक्रार गोबरवाही पोलीसात करण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस या अपघाताबद्दल अनभिज्ञ आहेत. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांनी तक्रार केली नाही असे समजते.
गोबरवाहीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे यांना विचारले असता गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अपघातग्रस्तांचा मेमो आला नाही असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The vehicle hit the pole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.