भाजीपाल्यांचे दर कडाडले
By Admin | Updated: May 30, 2014 23:29 IST2014-05-30T23:29:35+5:302014-05-30T23:29:35+5:30
यावर्षी ठोक बाजारात भाज्यांच्या किंमती आटोक्यात असल्या तरी किरकोळ विक्रीमध्ये भाज्यांचे दर कडाडलेच आहेत. पत्ता कोबी, तोंडले, पालक, टमाटर सामान्यांना परवडणारे आहेत. मे आणि जूनमध्ये

भाजीपाल्यांचे दर कडाडले
भंडारा : यावर्षी ठोक बाजारात भाज्यांच्या किंमती आटोक्यात असल्या तरी किरकोळ विक्रीमध्ये भाज्यांचे दर कडाडलेच आहेत. पत्ता कोबी, तोंडले, पालक, टमाटर सामान्यांना परवडणारे आहेत. मे आणि जूनमध्ये भाज्यांची आवक राहण्याची शक्यता आहे.
मध्यंतरीच्या काळात पाऊस जास्त झाल्याने भाजीपाला पिक खराब झाले होते. तेव्हाच्या लागवडीचा भाजीपाला आता भंडार्याच्या बाजारात येत आहे. नव्या लागवडीचा भाजीपाला पुढील महिन्यात विक्रीस येईल. यावर्षी लग्नसराईत किफायत दरात भाज्या उपलब्ध झाल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. मोठय़ा बाजारात स्थानिक उत्पादकांच्या मालाची आवक वाढली आहे. बुधवारी व रविवारी १५ ते २0 मिनी ट्रक आणि पाचचाकी वाहनातून भाज्या विक्रीस येत आहेत. टमाटर, कोथिंबीर, वांगे, फुलकोबी, पालक, मेथी या व्यतिरिक्त अन्य भाज्यांची आवक आहे.
ग्रामीण भागातील उत्पादक किरकोळ बाजारात थेट भाज्यांची विक्री करीत आहेत. भंडार्यात कांद्याची आवक वाढल्याने भाव नियंत्रणात आहेत. उन्हाळी कांद्याची साठवणूक करता येते. सध्या बाजारात येणारा कांदा साठवणुकीसाठी उपयुक्त नसल्याने विक्री सुरू आहे. आवक वाढल्याने भावही आटोक्यात आहेत. रविवारी भंडारा बाजारात चांगल्या प्रतिचा लाल व पांढरा कांद्याचे दर ४00 ते ४४0 रुपये मण (४0 किलो) असे आहेत. (शहर प्रतिनिधी)