लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परंपरागत भातशेतीला फाटा देत खडकाळ जमिनीवर ३२ एकरात बागायती शेती फुलविण्याची किमया मोहाडी तालुक्यातील डोंगरदेव शिवारात बंडू बारापात्रे यांनी केली. भाजीपाला उत्पादनातून त्यांनी प्रगतीचा मार्ग साधला असून शेतकऱ्यांना परंपरागत शेती सोडून नगदी पिकाकडे वळण्यासाठी ते सातत्याने मार्गदर्शन करीत असतात.भंडारा जिल्हा म्हणजे भातशेती असे समीकरण झाले आहे. शेतकरी परंपरागत भात शेतीशिवाय दुसऱ्या कोणत्याही पीकाचा विचार करीत नाही. त्यामुळे सातत्याने आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी बिटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी आपल्या शेतात प्रयोग केला आहे. खडकाळ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ३२ एकरात त्यांनी भाजीपाला उत्पादनाचा प्रयोग सुरु केला. आज त्यांच्या शेतात विविध भाजीपाला पिकांसह फळबागही फुलली आहे.जिल्ह्यात त्यांनी नवा आदर्श निर्माण केला असून आज त्यांचे शेत म्हणजे कृषीविभागाच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा झाली आहे. या शेतात पोहचताच हिरवेगार शेत डोळ्याला सुखावते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत त्यांनी शेती पिकविली आहे. शेतकºयांनी जे बाजारात विकते तेच पिकवावे असा सल्ला बंडू बारापात्रे देतात. भाजीपाला पिकाला जिल्ह्यात चांगली मागणी आहे. केवळ ४० दिवसापासून नगदी उत्पन्न देणारे यासारखे दुसरे पीक नाही असे ते सांगतात. या शेतात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मल्चिंग पेपर व ड्रिपचा उपयोग केला आहे.उच्चदर्जाचा भाजीपाला पिकविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भेंडी पिकातून त्यांनी चांगले उत्पन्न मिळाले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भेंडीलाचांगला भाव मिळतो. यामुळे शेतकऱ्यांनी आतापासून योग्य नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.डोंगरदेव येथील माझ्या ३२ एकरात बागायती शेती केली आहे. दररोज किमान १५ ते २० हजार रुपयाचे उत्पन्न हातात येत आहे. दोन एकरात लावलेल्या पपईतून ११ लाख ८५ हजार रुपयांचे उत्पन्न वर्षभरात हातात आले. आता शेतकऱ्यांनी शेतीत बदल स्वीकारून भाजीपाला पिकासाठी पुढे येणे गरजेचे आहे.- बंडू बारापात्रे,अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी
खडकाळ शेतजमिनीवर फुलविली भाजीपाला बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 21:41 IST
परंपरागत भातशेतीला फाटा देत खडकाळ जमिनीवर ३२ एकरात बागायती शेती फुलविण्याची किमया मोहाडी तालुक्यातील डोंगरदेव शिवारात बंडू बारापात्रे यांनी केली.
खडकाळ शेतजमिनीवर फुलविली भाजीपाला बाग
ठळक मुद्देडोंगरदेव शिवार : शेतकऱ्याने भाजीपाला उत्पादनातून साधला प्रगतीचा मार्ग