उन्हाळी शिबिरांतर्गत सखींनी घेतले विविध प्रशिक्षण

By Admin | Updated: May 4, 2015 00:42 IST2015-05-04T00:42:56+5:302015-05-04T00:42:56+5:30

लोकमत सखी मंच तुमसर तर्फे सखींकरिता महिन्याचे उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Various training programs by the lovers under the summer camp | उन्हाळी शिबिरांतर्गत सखींनी घेतले विविध प्रशिक्षण

उन्हाळी शिबिरांतर्गत सखींनी घेतले विविध प्रशिक्षण

तुमसर : लोकमत सखी मंच तुमसर तर्फे सखींकरिता महिन्याचे उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्थानिक शामसुंदर सेलीब्रेशन हॉलमध्ये सखींकरिता दुपारी १ ते ३ यावेळी दररोज वर्ग घेण्यात आले. ज्यात डांस, नृत्य, पेंटिंग, चॉकलेट, स्टार्टर, बंगाली मिठाई, ब्युटी सेमीनार यांचा समावेश होता. डान्स क्लास दीपक यांनी घेतले. पेंटिंग प्रशिक्षण वैशाली फटींग, चॉकलेट प्रशिक्षण कल्पना पटेल (गोंदिया), स्टार्टरचे प्रशिक्षण नेहा अग्रवाल, बंगाली मिठाईचे प्रशिक्षण प्रीती तंगडपल्लीवार, ब्युटी सेमीनारचे प्रशिक्षण रितू पशिने यांनी दिले.
सखींनी समर कँपचा पुरेपूर लाभ घेतला. समारोप प्रसंगी अल्पपोहार घेण्यात आला. संयोजिका रितू पशिने यांनी सर्व प्रशिक्षकांचे आभार मानले.
कार्यक्रमात डॉ.प्रिया बडवाईक, प्रीती तंगडपल्लीवार, संतोषी तितीरमारे, उन्नती मुरुतकर, कीर्ती क्षीरसागर, लुमिषा टेंभरे, शारदा चौधरी, हर्षना वाहने, ललीता शहारे, भारती बोरकर, हर्षा देशमुख, कल्पना सेलोकर, लीना हरडे, वीणा वरकटे, विजया देशमुख, सरिता देशमुख, वर्षा करंभे, नीतू चौधरी, प्रीती तलमले, किरण राखडे, लक्ष्मी तितीरमारे, वीणा चकोले, सोनाली कावळे, सनिया धुर्वे, अंजू धुर्वे आदी सखींनी समरकँपचा लाभ घेतला. (मंच प्रतिनिधी)

सरबत प्रशिक्षण व लोणचं स्पर्धा
भंडारा : लोकमत सखी मंचतर्फे भंडारा येथे दि. ४ मे रोजी दुपारी ४ वाजता खात रोड स्थित चिंतामणी मंदिरात शरबत प्रशिक्षण व लोणचं स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सखी, युवती व महिला नि:शुल्क सहभागी होतील. प्रशिक्षणात सात प्रकारचे शरबत शिकविण्यात येतील. त्यात कोकम, गुलाब, खस, कवट, आंबा, कडुनिंब अशा विविध प्रकारच्या फळांचे शरबत जे सहज उपलब्ध असतात व उन्हातून आल्यावर शरीराला थंडावा देतात. सखींनी घरूनच लोणंचे तयार करून आणणे. कार्यक्रमस्थळी विजयी स्पर्धकांना बक्षिस देऊन गौरविण्यात येईल. अधिक माहितीकरिता जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) व विभाग प्रतिनिधी दिपा काकडे (८२७५४०४२००) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Various training programs by the lovers under the summer camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.