विविध मागण्यांसाठी भटके विमुक्तांचा मोर्चा
By Admin | Updated: March 1, 2016 00:24 IST2016-03-01T00:24:37+5:302016-03-01T00:24:37+5:30
विमुक्त भटक्या जातीच्या विकासासाठी कार्यरत संघटनांनी आज भटके, विमुक्त बांधवांच्या विविध मागण्यांसदंर्भात ..

विविध मागण्यांसाठी भटके विमुक्तांचा मोर्चा
तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन : पवनी, साकोली, लाखांदुरात हजारोंची उपस्थिती
भंडारा : विमुक्त भटक्या जातीच्या विकासासाठी कार्यरत संघटनांनी आज भटके, विमुक्त बांधवांच्या विविध मागण्यांसदंर्भात साकोली, लाखांदूर व पवनी येथील तहसील कार्यालयावर सोमवारी, धडक मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून घेतले. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फेत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. मोर्चात हजारो भटके, विमुक्त बांधवांनी हजेरी लावली होती. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्ट्रीने पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.
साकोली : संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेतर्फे साकोली येथे विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा प्रगती कॉलनी येथून निघुन मुख्य मार्गाने तहसील कार्यालय साकोली येथे पोहचला. यानंतर तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आला.
या मोर्च्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत विमुक्त भटक्यांना ११ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतुद करावी, मासेमार समाजाला न्याय द्यावा, घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावे, क्रिमीलेअरची अट रद्द करण्यात यावी, वनहक्क कायदा २००६ अंतर्गत तलावातील मासेमारीचे हक्क भटके विमुक्तांना द्यावी, झुडपी जंगलाच्या जमीनीवर बसलेल्या भटक्यांच्या वस्त्यांना जमीनीचे पट्टे देऊन त्या नियमित करावे अथवा पुर्नवसन करावे, विमुक्त भटक्यांचे गायरान चराईचे हक्क सुरक्षीत करा, विमुक्त भटक्यांनी कसत असलेल्या अतिक्रमीत जमीनीचे नियमितीकरण करुन मालकी हक्क द्यावे, या मागण्यांचा समावेश होता.
मोर्च्यात अशोक शेंडे, डी. डी. वलथरे, डी. एन. मानकर, भोजराम चांदेकर, रेवाराम वलथरे, शिवपाल भोंडे, ईश्वर शेंडे, डी. डी. मेश्राम, महारु कांबळे, रेवाराम दिघोरे, ताराचंद मेश्राम, ब्रम्हानंद मेश्राम, देवराम वलथरे उपस्थित होेते.
लाखांदूर : संघर्ष वाहिनी, नागपूर या संघटनेच्या माध्यमातून आज तालूक्यातील ढिवर समाजाच्या बांधवांना विविध मागण्या सदंर्भात तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढला असून तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.
मुंबई व नागपूर येथील अधिवेशनादरम्यान अनेकदा भटके विमुक्ततांच्या विविध प्रलंबित मागण्या घेवून आंदोलन केली. मुख्यमंत्र्यांनी मोर्चेकऱ्यांना मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु अद्याप एकही मागणी पुर्ण झाली नाही. त्यामुळे आज, शेकडोच्या संख्येने ढिवर समाज बांधवांचा तहसलिवर मोर्चा धडकला. स्थानिक स्वराज्य संस्थेत विमुक्त भटक्यांना ११ टक्के आरक्षण देण्यात यावे, लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करण्यात यावी, विमुक्त भटक्यांसाठी स्वतंत्र बसलैनची व्यवस्था करण्यात यावी, मच्छीमार समाजाला विविध योजना व अर्थसहाय देण्यात यावा. या समाजातिल गरीबांना घरकुलचा विशेष बाब म्हणून लाभ देण्यात यावा, क्रिमिलीअरची अट रद्द करण्यात यावी, यासह इतर मागण्यां संदर्भात निवेदन तहसीलदार विजय पवार यांचेमार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना देण्यात आले. यावेळी हेमंत बावणे, श्रावण भानाटकर, जयसिंग नान्हे, राजेश शिवरकर, गुलाब नागपुरे, केशव सोनटक्के, वसंत शिंदे, अरुण मेश्राम, इस्तारी मेश्राम, प्रमिला कांबळे, सुषमा दिघोरे व इतर शेकडो नागरिक उपस्थित होते.
पवनी : संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषद पवनी तालुक्याच्या वतीने दुपारी १२ वाजता गांधीभवन जुना बसस्टॉप येथून मोर्च्याला प्रारंभ झाला.
मोर्चाचे नेतृत्व भंडारा मत्स्यव्यवसाय सहकारी संघ अध्यक्ष प्रकाश पचारे, धनगर समाज आरक्षण संघर्ष समिती भंडारा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश हातेल, लोहार समाज अध्यक्ष चरणदास बावणे, उपसरपंच अड्याळ देविदास नगरे, दादा आगरे, अनिता केवट, नामदेव वाघधरे, विलास डहारे, रुपचंद पचारे, शरद शिवरकर यांनी केले. मोर्चात भटके विमुक्त प्रवर्गातील ढिवर धनगर, लोहार, बेलदार, ओतारी, पारधी, गारुळी, नाथजोगी, बहुरुपी आदी बांधव आपल्या पारंपारिक वेशभूषेत नारे, घोषणा, ढोल ताशाच्या गजरात शहराला प्रदर्शना देवून मोर्चा तहसील कार्यालायवर धडकला. यावेळी मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले.
सभेत भटक्या प्रवर्गातील समाजावरील अन्याय, अत्याचार व दुर्लक्षीत प्रशासनावर मार्गदर्शन म्हणून प्रकाश पचारे, प्रकाश हातेल, चरणदास बावणे, चिंतामण कुंभारे, वाघमारे आदींनी मार्गदर्शन केले.
तहसिलदार वाकलेकर यांनी सभास्थळी येवून मागण्यांचे निवेदन स्विकारुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजीक न्याय मंत्री राजकुमार बडोले, महसुल मंत्री एकनाथ खडसे, खासदार नाना पटोले, आमदार रामचंद्र अवसरे यांना निवेदन तात्काळ पाठविण्याचे मोर्चेकऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी मोर्चात वामन दिघोरे, गिरधर घटारे, मधुकर शिवरकर, कैलास तुमसरे, प्रकाश मेश्राम, मारोती नान्हे, चंद्रशेखर पचारे, शरद शिवरकर, दिवारु चाचेरे, निलकंठ वलथरे, सज्जन दिघोरे, रामकृष्ण दिघोरे, डुकरू डहोर, शेवंता शहोर, लाखळू कुंभले, अंबर नागपूरे, चंद्रशेखर पचारे, परसराम चाचेरे, संजय कामथे, भागवान वाघधरे, सुनिल सुर्यवंशी, प्रदीप दिघोरे, फागो दिघोरे, भारत दिघोरे आदी उपस्थित होते.