पवनी तालुक्यात सखींसाठी विविध स्पर्धा, प्रशिक्षण

By Admin | Updated: December 8, 2015 00:38 IST2015-12-08T00:38:56+5:302015-12-08T00:38:56+5:30

लोकमत सखी मंच शाखा पवनी तर्फे येथील लक्ष्मी रमा सभागृहात तालुकास्तरीय विविध स्पर्धा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

Various competitions, training for teachers in Pawni taluka | पवनी तालुक्यात सखींसाठी विविध स्पर्धा, प्रशिक्षण

पवनी तालुक्यात सखींसाठी विविध स्पर्धा, प्रशिक्षण

सखी मंचचा उपक्रम : प्रशिक्षणाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पवनी : लोकमत सखी मंच शाखा पवनी तर्फे येथील लक्ष्मी रमा सभागृहात तालुकास्तरीय विविध स्पर्धा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला सखींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. पवनी येथील विशाखा नागपुरे यांनी पवनी, आसगाव, विरली, कोंढा येथे सखींना प्रशिक्षण दिले. तर अड्याळ येथे सिरॅमिक, पूजा थाळी, सजावटीचे प्र्रशिक्षण व साडी परिधानबाबत माहिती दिली. स्मरणशक्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक माधुरी हरडे, द्वितीय मंजू कहू तर तृतीय क्रमांक छाया जनबंधू यांनी पटकाविला. आसगाव येथे साडी सेटींग प्रशिक्षणात भावना मुंडले, अंजूषा मोहरकर, मिना फुंडे, सपना रहिले, रश्मी मुंडले, खुशी पडोळे, अरुणा जिभकाटे, पद्मा मोटघरे, अनिता महावाडे, सविता चित्रीव, वनिता सावरबांधे, विद्या भेंडारकर, निशा सावरबांधे, वृंदा तिघरे, सुनीता धांदे, इंदू काटेखाये, संगीता अंबादे, नेहा आसई, मंदा ढवळे, वीणा ढवळे, प्रतिभा रामटेके, पूजा नागपुरे, शेंडे, मनीषा लाखडे, कल्पना गोंडाणे उपस्थित होत्या. संचालन व आभार तालुका संयोजिका अलका भागवत यांनी मानले. (मंच प्रतिनिधी)

Web Title: Various competitions, training for teachers in Pawni taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.