लिपिकांच्या वेतनात तफावत
By Admin | Updated: December 15, 2015 00:42 IST2015-12-15T00:42:55+5:302015-12-15T00:42:55+5:30
लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांवर प्रशासनाच्यावतीने वेतन देताना तफावत आढळून येत आहे.

लिपिकांच्या वेतनात तफावत
भंडारा : लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांवर प्रशासनाच्यावतीने वेतन देताना तफावत आढळून येत आहे. यामुळे या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रमुख मागण्यासंदर्भात जिल्हास्तरीय बैठक शनिवारला आयोजित करण्यात आली होती.
लिपीक कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतनातील तफावत, पाचव्या वेतन आयोगापासून लिपीकांच्या वेतनश्रेणीत असलेली तफावत, शैक्षणिक पात्रतेनुसार वरिष्ठ श्रेणी, बदलत्या शासकीय धोरणानुसार कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण, राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे अतिरिक्त काम, अपुऱ्या सोई, सुविधा यामुळे लिपीक प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची मोठी गळचेपी होत आहे.
राज्य संघटनेच्या निर्देशानुसार शासनाविरूद्ध एल्गार पुकारण्याचा इशारा लिपीक कर्मचारी संघटनेने दिलेला आहे. समान पदावर काम करणारे महापालिकेचे, उच्च महाविद्यालयीन व राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कनिष्ठ व वरिष्ठ सहायक यांचे ग्रेड वेतन जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना समान वेतन लागू करून ग्रेड वेतनातील तसेच पाचव्या व सहाव्या वेतनातील तफावत सातव्या वेतन आयोगात पूर्ण करण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रभू मते, उपाध्यक्ष दिलीप सोनूले, केसरीलाल गायधने, यशवंत दुनेदार, अजाब चिचामे, विजय सार्वे, भागवत मदनकर, जयंत झुरमुरू, अविनाश चेटुले, रवि भुरे, श्रीकांत पवार, मनोहर ईटवले, सोमवंशी, हेमंत लोखंडे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)