नवीन राष्ट्रीय महामार्ग ठरतोय वृक्षांचा कर्दनकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:30 IST2018-11-19T21:30:32+5:302018-11-19T21:30:49+5:30
रस्त्यामुळे दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होवून विकासात महत्वपूर्ण भूमिका बजविते. सध्या मनसर-गोंदिया दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम जोमात सुरू आहे. दरम्यान रस्त्यालगतच्या झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. रामटेक-खापा रस्त्यावर हा प्रकार दिसत आहे. सातपुडा पर्वत रांगामधून हा रस्ता जात असल्याने हजारो वृक्षांचा बळी करावा लागणार काय, असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.

नवीन राष्ट्रीय महामार्ग ठरतोय वृक्षांचा कर्दनकाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रस्त्यामुळे दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होवून विकासात महत्वपूर्ण भूमिका बजविते. सध्या मनसर-गोंदिया दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम जोमात सुरू आहे. दरम्यान रस्त्यालगतच्या झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. रामटेक-खापा रस्त्यावर हा प्रकार दिसत आहे. सातपुडा पर्वत रांगामधून हा रस्ता जात असल्याने हजारो वृक्षांचा बळी करावा लागणार काय, असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.
मनसर-रामटेक-तुमसर-गोंदिया हा यापूर्वी राज्यमार्ग होता. सदर रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ करण्यात आला. मनसर ते बालाघाट-शिवनी असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. सध्या रस्ता बंद करण्याकरिता दोन्ही बाजूला खोदकाम करणे सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लहान मोठी वृक्ष आहेत. सदर वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. रामटेकपासून सातपुडा पर्वत रांगा सुरू होतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला येथे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने वृक्ष असल्याने त्यांची कत्तल केली जात असल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
तुमसर तालुक्यातील खापा-तुमसर-गोंदिया रस्त्याशेजारी यापूर्वी सामाजिक वनीकरण व वनविभागाने वृक्ष लागवड केली होती. सदर वृक्ष राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथडा येत असल्याने कापण्यात आले. गावातील शेतजमिनी, घरे यांची शासनस्तरावरून भुसंपादनाची कारवाई संथगतीने सुरू आहे. खापा चौकातील लहान मोठे हॉटेल व्यावसायीकांचे धाबे दणाणले असून काही घरमालकांचे घरे पाडणार व संसार उघड्यावर येईल काय, याची चिंता त्यांना भेडसावित आहे. खापा, मांगली, देव्हाडी, माडगी, काटेबाम्हणी, उसर्रा, धोप या गावांना जास्त फटका बसणार आहे.
पर्यावरणाला धोका पोहोचू नये याकरिता पर्यावरणपूरक बाबीकडे वृक्ष लागवड लक्ष देण्याची गरज आहे.
रस्त्या शेजारील वृक्षांची कत्तल करण्यात आली. सध्या रस्त्याचे कामे सुरू करण्यात आली. कामादरम्यान नागरिकांना धुळीचा आरोग्यावर परिणाम होणार नाही. त्याकरिता उपाययोजना करावी, जेवढ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली तेवढ्याच वृक्षाची लागवड करावी.
-विठ्ठलराव कहालकर,
अध्यक्ष, राकाँ, तुमसर- मोहाडी