वऱ्हाड्यांचा ट्रॅक्टर उलटला: ३१ जखमी

By Admin | Updated: April 28, 2015 00:38 IST2015-04-28T00:38:46+5:302015-04-28T00:38:46+5:30

तालुक्यातील चिखलाबोडी येथून मोहघाटाकडे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात ३१ वऱ्हाडी जखमी झाले.

Varahad's tractor overturns: 31 injured | वऱ्हाड्यांचा ट्रॅक्टर उलटला: ३१ जखमी

वऱ्हाड्यांचा ट्रॅक्टर उलटला: ३१ जखमी

मोहघाटा फाट्यावरील घटना : १९ जणांना भंडारात हलविले
लाखनी : तालुक्यातील चिखलाबोडी येथून मोहघाटाकडे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात ३१ वऱ्हाडी जखमी झाले. ही घटना मोहघाटा फाट्यावर सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यातील १९ जखमींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने भंडारा येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले.
स्थानिक पोलीस स्टेशनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, मार्कंड रामटेके यांचे ट्रॅक्टर व ट्रॉली नंबरची नोंद नसलेले ट्रॅक्टर मोहघाटा येथून मडावी यांची वऱ्हाड घेऊन चिखलाबोडील वरकडे यांचे वधुघरी विवाह समारंभासाठी गेले होते. विवाह आटोपल्यानंतर ट्रॅक्टर वऱ्हाड घेवून परतत असताना टॅक्टरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मोहघाटा फाट्यावर उलटला या अपघातात ३१ वऱ्हाडी जखमी झाले.
यात मीरा मडावी (५०), प्रणय फंदे (१९), सुंदर बोरकर (२०), किसन मडावी (६५), सचिन पेटकर (२०), सुभाष वाढवे (२५), भूषण मडावी (१५), सत्यभामा मडावी (५५), केशव मेश्राम (४२), संदीप लांजेवार (३०), लक्ष्मण मेश्राम (२३), मुकेश मेश्राम (१९), धमेंद्र फंदे (२८), पे्रमानंद बोरकर (२१), विमल सरोते (३५) सर्व रा. मोहघाटा, पुष्पा कोवे (४५) बोरगाव, सुनंदा उईके (५०) रेंगेपार कोठा, अमित कुनसरे (१४) मुरपार, प्रभा कुंभरे (१६) रामपुर, लोकेश सिडाम (१५) खोली, कमलेश न्यायमूर्ती (१५) अर्जुनी मोरगाव, अलका उईके (३२) रेंगेपार कोठा, लिला मडावी (५५), पुष्पा मडावी (५५) रा. गिरोला, सायत्रा मडावी (६५), कविता झलके (५०) रा. पिटेझरी, अमित कुंभरे (७) मुरपार, श्यामल सिरसाट (१९) मिरेगाव, मार्कंड वरकडे (४०), कुंदा उईके (५२), मंदा वरठे (४०) रा. मेंढा यांना लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यापैकी १९ व्यक्तींना भंडारा येथे रेफर करण्यात आले. लाखनी पोलिस स्टेशनमध्ये ट्रॅक्टर चालक विरूद्ध कलम २७९, ३३७ भादंवि १८४/१३४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.का. कचरू शेंडे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Varahad's tractor overturns: 31 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.