भंडारा येथे वनमहोत्सव कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:56 IST2019-07-08T00:55:34+5:302019-07-08T00:56:25+5:30

वनविकास महामंडळातील वनप्रकल्प विभाग भंडारा विभागीय कार्यालयाच्या परिसरात वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विभाग राज्यमंत्री व पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

Vanamahotsav program at Bhandara | भंडारा येथे वनमहोत्सव कार्यक्रम

भंडारा येथे वनमहोत्सव कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वनविकास महामंडळातील वनप्रकल्प विभाग भंडारा विभागीय कार्यालयाच्या परिसरात वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विभाग राज्यमंत्री व पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे , माजी खासदार शिशुपाल पटले, भंडारा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आशू गोंडाणे, नगरसेवक संजय कुंभलकर, वनकामगार संघटनेचे अध्यक्ष युवराज रामटेके, वनविकास महामंडळाचे अधिकारी वाय.आर. खोडणकर सहाय्यक व्यवस्थापक, वनपरिक्षेत्राधिकारी डी.बी. राऊत, डी.बी. नागदिवे, जी.जी. चव्हाण, एस.एम. होणे, वनपाल, वनरक्षक, वनमजूर तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. वन महोत्सव वन प्रकल्प विभाग भंडारा विभागीय व्यवस्थापक आर.के. तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनमहोत्सव कार्यक्रम पार पडला.

Web Title: Vanamahotsav program at Bhandara