व्हॅन दुभाजकावर आदळली
By Admin | Updated: March 25, 2015 00:44 IST2015-03-25T00:44:16+5:302015-03-25T00:44:16+5:30
भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वसूली पथकाची व्हॅन दूभाजकावर आदळल्याने महिला कर्मचाऱ्यासह इतर चार जण जखमी झाले.

व्हॅन दुभाजकावर आदळली
तुमसर : भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वसूली पथकाची व्हॅन दूभाजकावर आदळल्याने महिला कर्मचाऱ्यासह इतर चार जण जखमी झाले. जखमींवर तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. राजाराम मंगल कार्यालयासमोर तुमसर-भंडारा मार्गावर हा अपघात रात्री ८ वाजता घडला. येथे दुभाजकावर रिफलेक्टर नाही. मोहाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षामुळे नेहमी येथे अपघात घडतात.
जखमीत व्हॅन चालक प्रविण सार्वे (३६), सुदेश नंदेश्वर (४७), भास्कर गडेकर व सुशिला घोनमोडे यांचा समावेश आहे. मार्च महिन्याचा अखेर असल्याने भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसूली पथक तुमसर तालुक्यातील ग्रामीण परिसरात थकबाकीदारांकडे वसूली करीता गेले होते. वसूली नंतर पथक परत भंडारा येथे जात होते. तुमसर-भंडारा मार्गावर राजाराम मंगल कार्यालयाजवळ व्हॅन दुभाजकावर आदळून उलटली. यात बँकेचे चार कर्मचारी जखमी झाले. सुदैवाने पुढील अनर्थ टळला.
नागरिकांनी व पोलिसांनी धाव घेवून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तुमसर पोलीस पुढील चौकशी करीत आहे. पंचायत समिती कार्यालय ते शहरातील श्रीरामनगर रेल्वे फाटकापर्यंत दुभाजक तयार करण्यात आले. बाजार समितीसमोर, राजाराम मंगल कार्यालय तथा गभने सभागृहासमोर दुभाजका समोरील जागा मोकळी आहे. दुभाजकावर रिफलेक्टर नाही. रात्री अंधारात नवीन वाहन चालकांना दिसत नाही. त्यामुळे सरळ वाहन दुभाजकावर आदळतो. विशेषत: तात्काळ खबरदारी म्हणून रिफलेक्टर लावण्याची गरज आहे. चार वर्षापासून ही कामे पूर्णत्वास आली नाही. १५ दिवसापूर्वी बाजार समिती समोर तांदळाने भरलेला ट्रक दूभाजकावर आदळला होता. नियोजनाअभावी हा रस्ता धोकादायक ठरला आहे. (तालुका प्रतिनिधी)