व्हॅन झाडावर आदळली एक ठार

By Admin | Updated: December 25, 2014 23:27 IST2014-12-25T23:27:46+5:302014-12-25T23:27:46+5:30

एक्सप्लोसीव्ह व्हॅनमधील बारुद खाली करुन परत जात असतांना व्हॅनचा टायर फुटल्याने व्हॅन झाडाला आदळली यात चालक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज

Van planted a tree killed | व्हॅन झाडावर आदळली एक ठार

व्हॅन झाडावर आदळली एक ठार

व्हॅनमध्ये बारुद नव्हती : सराटी फाट्यानजीकची घटना
साकोली : एक्सप्लोसीव्ह व्हॅनमधील बारुद खाली करुन परत जात असतांना व्हॅनचा टायर फुटल्याने व्हॅन झाडाला आदळली यात चालक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साकोलीपासून चार किमी अंतरावरील सराटी फाट्यानजीक महामार्गाच्या बाजुला घडली. दुर्गेश निशाद (२५) रा. नवापरा छत्तीसगढ असे मृत चालकाचे नाव असून शिवशंकर रामाजी धुरु (२५) रा. तरंगा भाटापारा असे जखमीचे नाव आहे.
एक्सप्लोसीव व्हॅन क्रमांक सीजी ०४ जेडी ८१६५ ही भंडाऱ्याकडून रायपूरकडे जात असतांना सराटीफाट्याजवळ व्हॅनचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला व व्हॅन बाजुच्या झाडाला जाऊन आदळली. ही धडक एवढी जोरदार होती की व्हॅनची धडक झाडाच्या बुध्याला लागली. मात्र झाड वरच्या भागातून तुटून पडले. एवढेच नाही तर या धडकेनंतर व्हॅन बाजुच्या नाल्यात गेली. त्यामुळे व्हॅन समोरुन पुर्णपणे चेंदामेंदा झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस ताफा घटनास्थळी पोहचला तेव्हा या चेंदामेंदा व्हॅनमध्ये चालक व दुसरा इसम फसलेले होते. पोलिसांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर चालकाला कसेबसे बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याने जगाचा निरोप घेतला होता. तर शिवशंकर धुरु यांचेवर उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचार सुरु आहेत. मात्र ही व्हॅन कुठून कुठे गेली होती. याची नेमकी माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. तर व्हॅनमध्ये बारुद नव्हते. पुढील तपास पोलिस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Van planted a tree killed