पाऊणगावात वाघीणीचे दर्शन

By Admin | Updated: November 9, 2014 22:27 IST2014-11-09T22:27:14+5:302014-11-09T22:27:14+5:30

उमरेड कऱ्हांडला अभयारण्याअंतर्गत येणाऱ्या पवनी वनक्षेत्रात पाऊणगाव रोडवर टी - ५ या वाघीणीचे पर्यटकांना दर्शन झाले.

Vaghini philosophy at Pangaon | पाऊणगावात वाघीणीचे दर्शन

पाऊणगावात वाघीणीचे दर्शन

नागरिकांमध्ये भीती : पर्यटकांच्या संख्येत वाढ
पवनी : उमरेड कऱ्हांडला अभयारण्याअंतर्गत येणाऱ्या पवनी वनक्षेत्रात पाऊणगाव रोडवर टी - ५ या वाघीणीचे पर्यटकांना दर्शन झाले.
वनक्षेत्राधिकारी गायकवाड, भागवत आकरे तसेच वनरक्षक कोहाट यांनी पवनी अभयारण्याला भेट दिली असता, पाऊणगावच्या समोर १ कि.मी. अंतरावर रस्त्याच्या कडेला मचाणजवळ टी - ५ ही वाघीण सकाळी ९.३० च्या सुमारास दिसली. जवळजवळ ५ ते ६ मिनिटापर्यंत ती त्याच ठिकाणी थांबून होती. पवनीतील रहिवासी बंडू तटवार हे आपल्या मित्रपरिवारासह या व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली असता त्यांना देखील हीच टी - ५ वाघीण आढळली.
या अभयारण्यात जय हा वाघ असून टी - ५ ही वाघीण २५ कि.मी. च्या परिसरात भ्रमण करीत असल्याचे वनक्षेत्राधिकारी गायकवाड यांनी लोकमतशी बोतलाना सांगितले. उमरेड कऱ्हांडला हा १८९ कि.मी. चा परिसर असून या परिसरामध्ये जय हा फिरत असल्याचे वनक्षेत्राधिकारी गायकवाड यांनी सांगितले. या जंगलामध्ये रानगव्यांचे कळप असून बिबट्या, हरिण, सांभार, रानगाई, अस्वल, मोर, ससे आदी वन्यप्राणी भरपूर प्रमाणात असून पर्यटकांना पाहण्याच्या दृष्टीकोण योग्य असे हे अभयारण्य आहे. भंडारा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्याच्या अगदी जवळ असणारे हे अभयारण्य पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय कमी खर्चाचे अभयारण्य आहे. या ठिकाणी पर्यटकांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक देखील आहेत.
याच अभयारण्यामध्ये असणारे कोरंभी महादेवाचे मंदिर असून गिरजेच्या माहेर असलेले दोन मोठ्या कप्प्या आहेत. (पोकळी असलेली दरी) जंगलातून भ्रमण करताना पक्षाचे मधूर आवाज कानी पडत असतात. काही ठिकाणी वाघाच्या पाऊलाचे ठसे देखील पहावयास मिळतात. वाघ किंवा वाघीण कोणत्या दिशेनी गेली आहे हे यावरून आपल्याला कळून येते व त्यावरून आपणाला वाघ कुठे असेल असा अंदाज बांधता येतो. पर्यटकांना वन्यप्राणी पाहण्याच्या दृष्टीकोणातून मचाणाची व्यवस्था देखील या अभयारण्यात करण्यात आली आहे. या अभयारण्याला दररोज पर्यटक भेट देत असतात. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत असून बाहेर गावावरून येणाऱ्या पर्यटकांना यासोबत गोसे धरण, बौद्ध स्तूप व पवनीतील प्रसिद्ध मंदिरे पाहण्याचा योग साधता येतो. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Vaghini philosophy at Pangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.