शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

जिल्ह्यात सरकारी आठ तर सात खासगी रुग्णालयांतून दिली जाणार ज्येष्ठांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 5:00 AM

भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्करसह फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना  एकूण ८०७९ जणांना कोविड-१९ लस देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ९०२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. १ मार्चपासून सुरू होत असलेल्या या मोहिमेत उर्वरित व आगामी टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह अन्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे.

ठळक मुद्देदिलासा मिळणार : खासगी रुग्णालयात अडीचशे रुपयांत लस

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने आता १ मार्चपासून खासगी आणि सरकारी रुग्णालयातून लस दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील शासकीयसह खासगी दवाखान्यातून १५ ठिकाणी ही लस उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे यात सरकारी रुग्णालयातून नि:शुल्क तर खासगी रुग्णालयात अडीचशे रुपये मोजून लस दिली जाणार आहे.भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्करसह फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना  एकूण ८०७९ जणांना कोविड-१९ लस देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ९०२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. १ मार्चपासून सुरू होत असलेल्या या मोहिमेत उर्वरित व आगामी टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह अन्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे.

येथे मिळणार कोरोना लस

 जिल्ह्यातील सात तालुक्यांतर्गत आठ शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना लस दिली जाणार आहे. यात भंडारात दोन ठिकाणी तर मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, पवनी आणि लाखांदूर येथील प्रत्येकी एका सेंटरचा समावेश आहे. तसेच खासगी रुग्णालय अंतर्गत भंडारा येथील पार्वती नर्सिंग होम, पेस हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, इंद्राक्षी आय केअर, नाकाडे नर्सिंग होम, रंगारी नर्सिंग होम, भुरे हॉस्पिटल तुमसर व तुमसर सिटी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोणाला मिळणार लस

पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सुटलेले कर्मचाऱ्यांसह ६० वयोवर्ष ओलांडलेल्या नागरिकांना लस दिली जाणार आहे. मात्र गंभीर आजारी व्यक्ती किंवा लस घेण्यास सक्षम नसलेल्यांना ही लस दिली जाणार नाही. प्रथमदृष्टया तालुकानिहाय नोंदणी झालेल्यांना ही लस दिली जाणार आहे.

उर्वरित असलेल्यांनाही मिळणार लस 

 जानेवारी महिन्यापासून सुरू झालेल्या कोविड लसीकरण मोहिमेत पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात शिल्लक असलेले कर्मचारी यांनाही या मोहिमेंतर्गत लसीकरण करण्यात येणार आहे. साधारणतः एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के ज्येष्ठांची गणना करण्यात येते. यात ज्येष्ठांसह दोन टप्प्यात उर्वरित असलेले लोकांना ही लस देण्यात येणार आहे.

कशी होणार नाेंदणी१ मार्चपासून खासगी आणि सरकारी रुग्णालयात लस दिली जाणार आहे. यासंदर्भात आरोग्य ॲपअंतर्गत नोंदणी करायची आहे. ज्या सेंटरवर ही लस दिली जाणार आहे तिथे जाऊन संपर्क साधून लसीबाबत माहिती जाणून घेता येणार आहे.  याप्रसंगी कोविड नियमांचे पालन करणे ही सर्वांना बंधनकारक करण्यात आल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस