रिकाम्या भूखंडात वाढला विषाणुजन्य कीटकांचा वावर
By Admin | Updated: September 20, 2014 23:44 IST2014-09-20T23:44:02+5:302014-09-20T23:44:02+5:30
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रवींद्रनाथ टागोर वार्डातील संत जगनाडे चौकात एक खाली भूखंड आहे. येथे पाणी साचून असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहे.

रिकाम्या भूखंडात वाढला विषाणुजन्य कीटकांचा वावर
भंडारा : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रवींद्रनाथ टागोर वार्डातील संत जगनाडे चौकात एक खाली भूखंड आहे. येथे पाणी साचून असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक ४ ची धुरा चार नगरसेवकांवर नागरिकांनी सोपविली आहे. संत जगनाडे चौकात पालिकेचा भूखंड आहे. याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने यातील काही भागावर नागरिकांनी अतिक्रमण केल्याने आता थोड्या प्रमाणात खाली भूखंड शिल्लक आहे.
हा भूखंड अतिक्रमणाने वेढला आहे. यात पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचून राहते व मोठ्या प्रमाणात गवत आहे. त्यामुळे विषाणूजन्य किटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यासोबतच विषारी सापांचाही वावर येथे वाढला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्ह्यात डेंग्यूचे अनेक रूग्ण असून काहींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या खाली भूखंडात परिसरातील नागरिक व छोटे-मोठे व्यावसायीक घनकचरा टाकतात. त्यामुळेही दुर्गंधी पसरत आहे. भूखंडाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ी (शहर प्रतिनिधी)