शिकारीसाठी विद्युत प्रवाह शिकारी कुत्र्यांचा वापर
By Admin | Updated: May 11, 2014 23:08 IST2014-05-11T23:08:29+5:302014-05-11T23:08:29+5:30
तालुक्यात जंगले दाट असून येथे वन्यप्राणी व सागवन वृक्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. याचाच फायदा वनतस्कर व शिकारी घेत असतात.

शिकारीसाठी विद्युत प्रवाह शिकारी कुत्र्यांचा वापर
साकोली : तालुक्यात जंगले दाट असून येथे वन्यप्राणी व सागवन वृक्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. याचाच फायदा वनतस्कर व शिकारी घेत असतात. साकोली परिसरात वन्य प्राण्याची शिकार विद्युत प्रवाह आणि शिकरी कुत्र्याच्या साहाय्याने सुरु आहे. दरवर्षी शेकडो वन्यप्राणी या शिकारीना बळी पडत असूनही यावर उपाययोजनेसाठी वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. साकोली परिसरात जंगली मोठ्या प्रमाणात असून साकोली तालुक्याला लागूनच नागझीरा व नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्प लागून आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मुक्त संचार सुरू आहे. याचाच फायदा शिकारी होतात. या शिकारीचे प्रमाण उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळून येते. शिकारीची पद्धत शिकारीसाठी विविध पद्धतीचा वापर करण्यात येत असले तरी मुख्य प्रकार दोन आहेत. या शिकारीसाठी शिकारी कुत्रे तयार केले जातात. शिकारी जंगलात शिकारीसाठी जाताना शिकारी कुत्रे सोबत घेऊन जातात. जंगलात वन्यप्राण्याचा कुत्र्याच्या सहाय्याने पाठलाग करतात. शिकार थकली की हे कुत्रे शिकार करतात व शिकारी तिची विल्हेवाट करतात. तर दुसर्या प्रकारात विद्युत प्रवाहाचा वापर करतात. यात जंगलात व शेतात विद्युत प्रवाहाच्या तारा लांबवून ठेवल्या जातात व शिकार होताच त्या शिकारीची विल्हेवाट लावण्यात येते. नुकतीच चारगाव येथे अशाच प्रकारच्या शिकारीचा पर्दाफाश झाला होता. बरेचजण शिकारीचा उपयोग आपल्या उपजिविकेसाठी करतात. गावातील पाच ते सहा जणांची टोळीे तयार करुन जंंगलात शिकार करतात व मांस विक्रीसाठी गावागावात फिरुन पैसे कमवतात. (तालुका प्रतिनिधी)