बर्फगोळ्यात दूषित पाणी व रासायनिक रंगांचा वापर
By Admin | Updated: April 6, 2015 00:47 IST2015-04-06T00:47:07+5:302015-04-06T00:47:07+5:30
उन्हाळा आला की थंड पेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने बाजारपेठेत सजू लागतात.

बर्फगोळ्यात दूषित पाणी व रासायनिक रंगांचा वापर
आरोग्याशी खेळ : गोड चवीसाठी सॅकरीनचा वापर
भंडारा : उन्हाळा आला की थंड पेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने बाजारपेठेत सजू लागतात. ग्रामीण भागातील गावागावांत तसेच शहरी भागात बर्फगोळा विकणाऱ्या गाड्याची रेलचेल पहावयास मिळते.
उन्हाची दाहकता उष्णता शमविण्यासाठी बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्यांजवळ लहान मोठी मुलांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. परंतू बर्फ गोळा खाणे वैद्यकीयदृष्ट्या शरीरास हानीकारक आहे. बऱ्याच बर्फ कारखाण्यात बर्फाच्या निर्मितीकरिता दूषित पाणी उपयोगात घेऊन बर्फाची निर्मिती केली जाते.
बर्फगोळा विकण्याऱ्या गाड्यांवरसुध्दा दूषित पाण्यापासून निर्मित बर्फ वापरत असल्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर्फगोळ्याची निर्मिती करताना साखर ऐवजी साकरिनचा उपयोग करून त्यात रासायनिक रंगाचा वापर केला जातो. यामुळे मुलांच्या खाद्यात रासायनिक रंग उपयोगता आणल्या जात असल्याने घशाच्या आजारावरचे विकास मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची उदाहरणे दरवर्षी मोठ्या प्रमाणात दिसून येत असतात.
ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील शाळा महाविद्यालये लग्न समारंभचा ठिकाणी आॅईस गोळा विकण्याची गर्दी अलीकडेच वाढतच आहे. बर्फ विकण्याऱ्या गाड्याजवळ शाळकरी मुल-मुली उष्णतेची दाहकता समवण्यासाठी आईस गोळा खान्याकडे आकर्षिले जात आहेत.
बर्फगोळ्यात वापरल्या जाणाऱ्या रासायनीक रंग ही निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे व त्याचा खाद्यपदार्थात वापर केल्यामुळे घशाचे विकार वाढल्याचे समोर येत आहेत. उन्हाळ्यात बर्फाचा सेवन करूनये असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञाकडून देण्यात येतो. पण उन्हाळ्यात उष्णतेमुळे तहान खूप लागत असल्यामुळे थंड पाणी मिळावे यासाठी बर्फाचा वापर केला जातो दुपारी १२ ते ४ या वेळात उन्हाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बर्फ गोळ्याचा गाडी जवळ लहान मुलांसोबतच मोठ्यांचीसुद्धा प्रचंड गर्दी पाहावयास मिळते.
उन्हाळा सुसह्य करण्यासाठी अबालवृध्दांनी आईस्क्रीम पार्लर आॅइस गोळ्याचा गाड्या रसवंती गृह अशा ठिकाणाचा आधार घेतला आहे. शाळा-महाविद्यालयाचा परिसरात बर्फगोळ्याचा गाड्यावर बरीच मोठी गर्दी दिसू लागली आहे.
ग्रामीण व शहरी भागात जागोजागी कलीगंडाचा गाड्या दिसू लागल्या असून मोबाईल रसवंत्या येणाऱ्या जाण्याऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या कलीगंड आणि काकडीचा बाजार तेजीत आला आहे.
चौकाचौकात रसवंती, शरबत, लिंबू रस, लिंबू पाणी, आईसगोला, कुल्फीच्या गाड्याची संख्या बरीच वाढली आहे. परिणामी यावेळी लिंबूच्या मागणीत वाढ होत चालली असून लिंबाचा किमतीही वाढल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)